Karuna Munde Vs Walmik Karad : वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार; करुणा मुंडेंच्या दाव्यानं खळबळ

Karuna Munde Visit Walmik Karad Jail Santosh Deshmukh Murder Case Beed : बीड मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला करुणा शर्मा-मुंडे जेलमध्ये भेटायला जाणार आहे.
Karuna Munde Vs Walmik Karad
Karuna Munde Vs Walmik Karad Sarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh murder case : बीडच्या मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार जेलमध्ये आहेत. कराड अन् गीते टोळी जेलमध्ये टोळीयुद्ध भडकल्याची मध्यंतरी चर्चा होती.

यातच कराड याला जेलमध्ये मारहाण झाल्याचे समोर आले. या घटनेवरून विविध प्रतिक्रिया उमटल्या असतानाच, बीडचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी वाल्मिक कराडबाबत मोठं विधान केलं आहे.

वाल्मिक कराड याला जेलमध्ये मारहाण झाली. त्याची आता पूर्ण दहशत संपल्यासारखेच आहे. जसं मला मारलं होतं. तसंच वाल्मिक कराड याला जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याचं माझ्या सूत्रांनी सांगितल्याचा दावा करूणा शर्मा-मुंडे यांनी केला.

Karuna Munde Vs Walmik Karad
Dada Bhuse Hindi language : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; आता 'अनिवार्य' शब्द हटणार, मोठ्या विरोधानंतर निर्णय

मी बीडमध्ये (BEED) आल्यानंतर, मी शपथ घेतली होती की, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत संपवून टाकणार म्हणून. जेलमध्ये आता त्याला आठवत असेल. मी वाल्मिक कराड याला जेलमध्ये भेटायला जाणार आहे. त्यांनी 3200 लोकांना त्याने खोट्या केसमध्ये अडकवले आणि जेलमध्ये पाठवले, आता त्याच जेलमध्ये त्याला ठेवले आहे, असा टोला करूणा शर्मा-मुंडे यांनी लगावला.

मी आता परवानगी मागणार आहे आणि वाल्मिक कराड याला भेटणार आहे. अजितदादांनी अजून मंत्रिपद कोणाकडे दिले नाही. आज धनंजय मुंडे मंत्री नसेल, तरी प्रशासन काही करत नाही. वाल्मिक कराड याला बाहेरून जेवण येते. कॉट सुधा आहे. साठ वर्षांचा म्हातारा जेलमध्ये बसून दहशत पसरवतो आहे, प्रशासन नेमके काय करतय? जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे, असा आरोप देखील करूणा शर्मा-मुंडे यांनी केला.

वाल्मिक कराड याला जेलमध्ये झालेल्या मारहाणीवर करूणा शर्मा-मुंडे यांनी स्वतःच्या सूत्रांचा हवाला देत, वाल्मिकला जेलमध्ये जबर मारहाण झाल्याचा दावा केला. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, जेलमधील सीसीटीव्ही फुटेज काढा. त्यामध्ये सर्व काही दिसेल. आता वाल्मिक कराड याची दहशत संपली आहे, असेही शर्मा-मुंडे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com