Dada Bhuse Hindi language : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; आता 'अनिवार्य' शब्द हटणार, मोठ्या विरोधानंतर निर्णय

Mahayuti government Shiv Sena Minister Dada Bhuse Announces Mandatory Hindi Subject in Maharashtra Schools : शिवसेना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या आदेशातील अनिवार्य शब्दावरून मोठी घोषणा केली आहे.
Dada Bhuse Hindi language
Dada Bhuse Hindi languageSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti government education policy : देशात एक संपर्क सूची तयार होण्यासाठी हिंदी भाषा नवीन शैक्षणिक धोरणानुसार लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा समावेश असेल, असे महायुती सरकारने जाहीर केले.

यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत, महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल, तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे', अशी भूमिका घेतली. मनसेच्या या भूमिकेनंतर महायुती सरकार एकदम बॅकफूटवर गेलं असून महायुतीमधील शिवसेनेचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठी प्रतिक्रिया केली.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पत्रकार परिषद घेत, हिंदी भाषा केंद्र सरकारकडून थोपवली जात असल्याचा कुठही प्रकार नाही. हिंदी भाषा 'अनिवार्य', असा उल्लेख सरकार निर्णयात आहे, तो सरकार निर्णय हटवून नवा सरकार निर्णय निर्गमीत केला जाईल, असे सांगितले.

Dada Bhuse Hindi language
Jal Jeevan scam : विखे पिता-पुत्र, लंके अन् पवारांमध्ये राजकारण तापलं; गुन्हा नोंदवा, पुढं बरचं काही होणार

नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये स्पष्टपणे भाषेच्या संदर्भातला पॅराग्राफ आहे. शाळांमध्ये (School) तीन भाषा शिकवण्यासंदर्भात, तीन भाषेचा हा फॉर्म्युला तिथं दिलेला आहे. केंद्राने कोणतीही भाषा राज्यासाठी बंधनकारक केलेली नाही. 2020चे शैक्षणिक धोरण आहे. त्यानुसार, 9 सप्टेंबर 2024 ला तीन भाषांपैकी दोन भाषा आपल्या देशाच्या संबंधित असल्या पाहिजे, असं सांगण्यात आलं आहे, याकडे दादा भुसे यांनी लक्ष वेधलं.

Dada Bhuse Hindi language
Harshita Goyal UPSC : हरियाणात जन्मली, गुजरातमध्ये शिक्षण घेतलेल्या हर्षितानं 'UPSC' परीक्षेत कमाल केली

राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत तिसरी भाषा हिंदी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय झाल्याकडे लक्ष वेधताना, यासंदर्भातील सरकारी निर्णयात हिंदी भाषा 'अनिवार्य', असा उल्लेख झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे, 'अनिवार्य' या शब्दाला स्थगिती देत आहोत आणि पुढील सरकार निर्णय लवकर काढला जाईल, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी विषय बंधनकारकच राहणार आहे. इतर माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा मराठी भाषा विषय बंधनकारक असेल. त्या शाळेत मराठी शिकवणारे शिक्षक सुद्धा मराठी भाषेत पदवी मिळवलेले असले पाहिजे याचेही बंधन असेल, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची करण्यात आल्याने वाद पेटलेला आहे. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधात मनसेचे राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रातील काही भागात मनसे सैनिकांनी आंदोलन देखील केली. यानंतर राज्य सरकारच्या सुकाणू समितीत असलेल्या शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी देखील हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करणे चुकीचा निर्णय ठरेल, असा म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com