Karuna Sharma Allegations On Dhananjay Munde : कोट्यावधींच्या पॉलिसीचा उल्लेख करत करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Karuna Sharma Allegations On Dhananjay Munde: गेल्या दोन-तीन वर्षांपासून करुणा मुंडेंनी अनेकदा धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत.
Karuna Sharma - Dhananjay Munde
Karuna Sharma - Dhananjay Munde Sarkarnama

Parali News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. याचं कारण म्हणजे करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. 'कायद्यानुसार मी कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे. मी ब्लॅकमेकलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याचे कागदपत्रे देईल.'' असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

Karuna Sharma - Dhananjay Munde
Girish Bapat News : ''महाराष्ट्रातील सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे...''; शरद पवारांकडूनही बापटांच्या निधनावर शोक व्यक्त

निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात धनंजय मुंडेंनी माहिती लपवल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. 1998 पासून आम्ही एकत्र असून 2004 पासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होतो. आजपर्यंत कोर्टाच्या ऑर्डरमुळे गप्प बसले, पण कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी खोटी माहिती दिली आहे. सगळ्या कागदपत्रात मी धनंजय मुंडेंचं नाव लावते. असाही दावा शर्मा यांनी केला आहे.

'माझ्या एक कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्ये वारसदार म्हणून धनंजय मुंडेंचच नाव आहे. माझ्या पासपोर्टमध्ये आणि माझ्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावर, आधारकार्डवरही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं नाव आहे. धनंजय मुंंडेंच्या दोन कोटी रुपयांच्या पॉलिसीवरही माझं नाव बायको म्हणून आहे. त्या पॉलिसीवर वारसदार म्हणून माझंच नाव आहे. आमचं दोघांचं बँकेत जॉईंट अकाऊंट आहे. असही शर्मांनी म्हटलं आहे.

Karuna Sharma - Dhananjay Munde
Girish Bapat's Last Interview: 'कार्यकर्त्यांचं कार्य मेलं, नुसते पुढारी राहिले,' ; खालावलेल्या राजकारणावर शेवटच्या मुलाखतीत बापट म्हणाले..

इतकचं नव्हे तर, 'पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्रांसह इतर अनेक कागदपत्रांवर माझं नाव 'करुणा धनंजय मुंडे' असंच आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करुन त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली. पण पोलीस आणि प्रशासन माझा छळ करत असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केला आहे.

सोशल मीडियावर मला लोक शिव्या देतात. २००१ मध्ये दागिने आणि घर विकून हृदयात छिद्र आहे, असं सांगून त्यांनी माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले. मी मुंडेंना घटस्फोट देणार नाही. कायद्यानुसार मीही कोट्यावधींची मालकीण असल्याचं  करुणा मुंडेंनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com