Karuna Sharma: पंकजाताई किती त्रास देत होती, आज तिचा आधार वाटतो? करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंना सवाल

Karuna Sharma questions Dhananjay Munde: "तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांना पंकजाताई न्याय देतील, कशाप्रकारे न्याय देतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही जनतेची सेवा, शेतकऱ्यांची सेवेसाठी हे बहीण-भाऊ एकत्र आलेले नाही, असा घणाघात करुणा मुंडेंनी केला.
Karuna Sharma - Munde
Karuna Sharma - MundeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics latest news: भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर दसरा मेळावा झाला, मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी कठीण काळात आपल्याला पंकजाताईंनी कसा आधार दिला, यावर सांगितले. यावर मुंडे यांच्या करुणा मुंडे यांनी सवाल उपस्थित केला. मुंडे-भाऊ-बहीणीच्या नात्यावर भाष्य केले आहे.

मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे मुंडेंना विरोधकांनी घेरलं होते. टीकेचे झोड उठल्यानंतर मुंडेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी दसरा मेळाव्यात आपली व्यथा मांडली. या कठीण काळात आपल्याला कुणी साथ दिली याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. धनंजय मुंडे यांचा दावा करुणा मुंडे यांनी खोडून काढला.

जे दोन भाऊ-बहीण 2009 पासून 2022 पर्यंत एकमेकांच्या विरोधात कट कारस्थान रचत होते. जी बहिणीने त्यांना त्रास दिला, तिला ते आज आधार मानत आहे. तुम्ही माझ्या मांडीवर रात्री दोन-दोन, तीन वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटतो का? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंडे यांनी पंकजाताईंकडे केली. या मुद्दावरही करुणा शर्मा यांनी टीका केलीय. "तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांना पंकजाताई न्याय देतील, कशाप्रकारे न्याय देतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही जनतेची सेवा, शेतकऱ्यांची सेवेसाठी हे बहीण-भाऊ एकत्र आलेले नाही, असा घणाघात करुणा मुंडेंनी केला.

Karuna Sharma - Munde
Sharad Pawar: वाजपेयींच्या भेटीनंतर शरद पवारांनी आंबेडकरांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली...

काय म्हणाले होते धनंजय मुंडे

गेले २५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिलाय.

Karuna Sharma - Munde
Manoj Jarange: मी थोड्या दिवसांचा पाहुणा...!नारायण गडावर मनोज जरांगे भावनिक

काय म्हणाल्या करुणा शर्मा

दसऱ्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले. हे संकेत आहे की काय पण असू द्या, आमच्या पोटाचे पाणी वाल्मिक कराडशिवाय ना हलत होतं, ना हलणार.., त्यासाठी आज तुम्हाला परळीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नको आहे.जे गुंडागर्दी संपवतील. जरी माझ्यासारखा कोणी नवीन आला तर तो गुंडागर्दी संपवेल, राजकारण आहे ते संपवतील. त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई-बहीण एकत्र आलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com