सूर जुळले; सत्तारांमुळे शिवसेनेची जिल्ह्यात ताकद वाढल्याचे श्रेय देत खैरेंनी केले कौतुक..

सामाजिक कार्यातही सत्तार अग्रेसर असून दुष्काळ व कोरोना काळातील त्यांचे मदतकार्य सामान्यांसाठी महत्वाचे ठरले. ( Chandrakant Khaire)
Abdul Sattar-Chandrakant Khaire
Abdul Sattar-Chandrakant KhaireSarkarnama

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याचे पालन करून पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी ताकतीनीशी उभे राहा. (Shivsena) प्रत्येक जागेवर शिवसेनेचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी संकल्प करावा, (Abdul Sattar) असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सिल्लोड येथील शिवतेज मोहिमेत केला.

तसेच जिल्ह्यात अब्दुल सत्तार यांच्या पक्षप्रेवशानंतर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याची कौतुकाची थाप देखील खैरे यांनी सत्तारांच्या पाठीवर मारली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवतेज मोहिमेला सिल्लोडमधून सुरूवात झाली. विशेष म्हणजे या मोहिमेत चंद्रकांत खैरे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे कौतुकही केले.

सत्तार शिवसेनेत दाखल झाल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील पक्षाचे नेतृत्व आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, दूध संघ आदी निवडणुकांमध्ये सत्तार यांचीच भूमिका महत्वाची ठरली होती. पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी देखील सत्तार यांचे नेतृत्व मान्य करत त्यांना पाठिंबा दर्शवल्याचे अनेक राजकीय घडामोडीतून समोर आले होते.

त्यामुळे सत्तार आणि खैरे यांच्या फार चांगले संबंध होते असे चित्र नाही. परंतु शिवतेज मोहिमेच्या निमित्ताने त्यांचे सूर काहीस जुळतांना दिसत आहेत. खैरे यांनी आपल्या भाषणात सत्तार यांची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खैरे म्हणाले, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, बाजार समिती अशा विविध क्षेत्रात भगवा फडकत असून जिल्ह्यात शिवसेना अतिशय मजबूत होतांना दिसत आहे. याचे श्रेय राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना जाते.

Abdul Sattar-Chandrakant Khaire
ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; वारंवार हल्ले होत असतांना सरकार कशाची वाट पाहत आहे?

सामाजिक कार्यातही सत्तार अग्रेसर असून दुष्काळ व कोरोना काळातील त्यांचे मदतकार्य सामान्यांसाठी महत्वाचे ठरले. पीपीई किट घालून दवाखान्यात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना त्यांनी धीर देण्याचे काम केले असे गौरवोद्दगार काढतांनाच या काळात केंद्रीय मंत्री दानवे किंवा भाजपचा एकही जण दिसला का? असा सवालही खैरे यांनी केला. भाजपला केवळ सत्ता हवी आहे, त्यांच्यात कोणत्याही प्रकारची दानत नाही, असा टोला देखील खैरेंनी रावसाहेब दानवेंना लगावला.

सोयगाव नगर पंचायत समितीच्या निमित्ताने या मतदार संघातील शिवसेनेची ताकद दिसून आली. शिवतेज अभियानाची सुरुवात सिल्लोड मधून झाली म्हणजे पक्षाने याची दखल घेतली असे स्पष्ट करीत सिल्लोड मतदार संघातून सर्वच उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष देखील शिवसेनेचेच होतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी व्यक्त करत खैरेंचीच री ओढली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com