BJP News : लातूरमधील 52 हजार लाडक्या बहि‍णींनी देवेंद्र फडणवीसांना पाठवल्या राख्या!

From Latur, over 52,000 beloved sisters sent rakhis to Devendra Fadnavis : लाडक्या बहि‍णींनी या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल 52 हजार राख्या पाठवल्या आहेत.
CM Devendra Fadnavis-Rakshabandhan News
CM Devendra Fadnavis-Rakshabandhan NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur Politics News : राज्यात महायुतीची सत्ता आणण्यामध्ये 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना प्रभावी ठरली होती. सध्या या योजनेतील गैरप्रकाराची सर्वत्र चर्चा होत असली तरी सरकारच्या या योजनेचा लाभ मिळालेल्या बहिणी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूष आहेत. खरतरं ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात आली आणि ती देवेंद्र फडणवीस यांनी तशीच पुढे सुरू ठेवली.

लाडक्या बहि‍णींनी या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना तब्बल 52 हजार राख्या पाठवल्या आहेत. लातूर भाजपाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांच्या पुढाकारातून महिला मोर्चाच्या वतीने हे अभियान रावबण्यात आले. जिल्ह्यातील लाडक्या बहि‍णींनी राखीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यात रक्षाबंधन अभियान राबवण्यात आले. जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक 52 हजार राख्यांचे संकलन पक्षाच्या महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आले. संकलित केलेल्या सर्व राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी लातूर (Latur) येथील भाजप लातूर ग्रामीण जिल्हा कार्यालय येथे नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी सभापती निळकंठ मिरकले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांची यावेळी उपस्थिती होती.

CM Devendra Fadnavis-Rakshabandhan News
लातूर ग्रामीणची थेट पाकिस्तानशी तुलना, भाजप आमदार Ramesh Karad काय म्हणाले पाहा | Latur Rural |

महायुतीचे सरकार येण्यात लाडक्या बहि‍णींचा सिंहाचा वाटा आहे. लाडक्या बहि‍णींना आर्थिक स्वावलंबी करून त्यांचा सन्मान वाढवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या राख्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना विकसित महाराष्ट्रासाठी बळ मिळेल. यापुढे अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

CM Devendra Fadnavis-Rakshabandhan News
BJP Politics : उपराष्ट्रपदीपदाच्या उमेदवाराचे नक्षल कनेक्शन, बी सुदर्शन रेड्डी यांच्यावर भाजपचा हल्लाबोल, ठाकरे पवारही टार्गेट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या शहर आणि ग्रामीणच्या भाजपा अध्यक्षांनी महिलांचे संघटन बांधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांना लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक 52 हजार राख्या पाठवत लातूरने बाजी मारली आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये पक्ष महिलांना किती प्राधान्य देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com