BJP Politics : उपराष्ट्रपदीपदाच्या उमेदवाराचे नक्षल कनेक्शन, बी सुदर्शन रेड्डी यांच्यावर भाजपचा हल्लाबोल, ठाकरे पवारही टार्गेट

Keshav Upadhye riticizes B Sudarshan Reddy : इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यामुळे नक्षल विरोधी चळवळ कमजोर झाल्याचा दावा भाजपने केले आहे.
B Sudarshan Reddy
B Sudarshan ReddySarkarnama
Published on
Updated on

BJP News : उपराष्ट्रपतीसाठी होणार निवडणुकीत इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरून भाजपने बी सुदर्शन रेड्डी यांच्यावर टीका करत त्यांच्यामुळे नक्षल विरोधी चळवळाचा पाया उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, 'सलवा जुडूम ही नक्षली कारवायामुळे त्रस्त असलेल्या गोरगरीब गावकऱ्यानी सुरू केलेली चळवळ होती. पण २०११ मध्ये न्या. रेड्डी यांनी दिलेल्या निर्णयामुळे छत्तीसगड सरकारचे नक्षली हिंसाचारविरोधी अभियान कमजोर झाले. माओवाद्यांना अप्रत्यक्षपणे संरक्षण मिळाले आणि सलवा जुडूमसारख्या स्थानिक प्रतिकार चळवळींचा पाया उद्ध्वस्त झाला. या प्रकरणातील याचिकाकर्त्यांवर नक्षलवादी गटांशी संबंध असल्याचे आरोप होते, ज्यामुळे या निर्णयाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

ठाकरे, पवार टार्गेट

'सर्वसामान्यांच्या आक्रोशातून, संतापातून सुरू झालेल्या ‘सलवा जुडूम’ या नक्षलविरोधी चळवळीविरोधात निकाल देणारे माजी न्यायमूर्ती व काँग्रेसचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना उबाठा व शरद पवार गट पाठिंबा देणार का?', असे म्हणत उपाध्ये यांनी ठाकरे, पवारांना टार्गेट केले आहे.

B Sudarshan Reddy
Ajit Pawar : 'राष्ट्रवादीचे मंत्री नागपुरात येतात अन् विमानाने उडून जातात', अजितदादा सर्वांना वॉर्निग द्या

ठाकरे लाल सलाम करणार का?

बाळासाहेब ठाकरे यांनी कायम धगधगता भगवा प्राणप्रिय मानला. नक्षलवादी चळवळीला कायम विरोधच केला. पण सत्तेसाठी हाच भगवा त्यागून काँग्रेसच्या वळचणीला गेलेले व राहुल ल गांधीच्या दरबारात शेवटच्या रांगेचे मांडलिकत्व स्वीकारलेले उध्दव ठाकरे हे लाल सलाम करणार का याचे उत्तर संजय राऊत यांनी दिले पाहिजे, असे देखील उपाध्ये यांनी म्हटले आहे. तसेच सोनिया, राहुल दरबारातील अंकित संजय राऊत याचेही समर्थन करतील व ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे दैनिक’ ही ‘सामना’ची टॅगलाईन बदलून ‘सत्तेसाठी लाल सलाम करणारे दैनिक’ अशीही करतील, असा टोलाही लगावला.

B Sudarshan Reddy
Ajit Pawar : 'वैयक्तिक कामे होणार नाहीत आणि आणूही नका' : अजितदादांचा विदर्भाच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com