BJP Ganesh Hake : भाजप नेत्याकडून शेतकऱ्याची थट्टा; मदतीऐवजी औत ओढतानांचं फोटोशूट, खुलासा करता करता दमछाक

Opposition Slams BJP Ganesh Hake Over Farmer Ploughing Video in Latur Ahmedpur : भाजपचे लातूरमधील पदाधिकारी गणेश हाके यांनी औत ओढतानाचं केलेल्या फोटोशूटवरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे.
BJP Ganesh Hake
BJP Ganesh HakeSarkarnama
Published on
Updated on

BJP leader ploughing video controversy : लातूर अहमदपूरमधील शेतकरी अंबादास पवार स्वतःला औताला जुंपून तो ओढताना, आणि त्यांना मदत करताना त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पवारांच्या कर्जाचा भरणा केला, तर बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड यांनीही पवार कुटुंबीयांची भेट घेत मदतीचा हात दिला. पण भाजपचे गणेश हाके यांनी मात्र शेतकरी पवार यांच्यासारखा औत ओढताना व्हिडिओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला. यावरून भाजपच्या शेतकरी प्रेमावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

अहमदपूर (जि. लातूर) तालुक्यातील हाडोळती इथले अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्यांने (Farmer) शेतीच्या मशागतीसाठी बैल नसल्याने स्वतः खांद्यावर औत घेत मशागत करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांसमोर आला. या शेतकऱ्याच्या बांधावर जात भाजप स्थानिक पदाधिकारी गणेश हाके यांनी तोच औत स्वतः खांद्यावर घेत ओढतानाचा व्हिडिओ काढला.

भाजपचे (BJP) गणेश हाके यांचा हा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावरून गणेश हाके आणि भाजपचे शेतकरी प्रेम, त्यातून शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची टीका होऊ लागली आहे. गणेश हाके यांच्या या कृतीच्यानिमित्ताने भाजपला समाज माध्यमांवर ट्रोल केले जात आहे.

BJP Ganesh Hake
Beed Parli politics : धनंजय मुंडेच्या परळीत जादूटोण्याचा प्रयोग? अजितदादाच्या पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याचा प्रताप

गणेश हाके यांच्यावर प्रचंड टीका सुरू असून, भाजपचे हाके हे अंबादास पवार यांना मदत करायला गेले होते की स्टंटबाजी करायला, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शेतकऱ्याचे जीवन कसे अवघड असते, माझ्यासारख्या धडधाकट माणसालाही औत ओढायला कष्ट करावे लागत आहेत, असे म्हणताना गणेश हाके दिसत आहे. गणेश हाके यांनी संबंधित शेतकऱ्याची मदत सोडा, पण स्वत: केलेल्या स्टंटबाजी केल्याची टीका होत आहे.

BJP Ganesh Hake
BJP strategy Mumbai politics : ठाकरे बंधूंमधील एकी कितपत टिकेल? आघाडीचं काय होणार? भाजप कोणता डाव टाकणार?

गणेश हाके यांनी हा 75 वर्षांचा शेतकरी कष्ट करतो आहे. त्याच्या वेदना जाणून घेण्यासाठी, मी औत ओढला. यानंतर मला कळालं की, शेतकरी कुठल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने शेती करतोय. मला प्रसिद्धीचा सोस नाही. मी तिकडे गेलो तेव्हा तेथील प्रसारमाध्यमांनी माझा व्हिडीओ शूट केला. तो व्हिडीओ मी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला नाही, असे म्हटले आहे.

सहकारमंत्र्यांकडून पवारांचा कर्जाचा भरणा

दरम्यान, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अंबादास पवार यांच्या कर्जाचा भरणा केल्याचे पत्र दिले. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी पवार यांच्याशी फोनवर संवाद साधत सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. अधिवेशन झाल्यानंतर पाटील यांनी शेतकऱ्याच्या घरी जाऊन चौकशी केली. सर्व कर्जाचा भरणा करत सातबारा कोरा केला. तसेच पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मुलाला सरकारी निकषानुसार कोणत्याही कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन दिले.

आमदार गायकवाडांकडून मदत

बुलढाणा इथले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एक बैलजोडी, 50 हजार रुपये रोख, वर्षभर पुरेल इतका किराणा, धान्य व शेतकरी दांपत्याला आहेर करत पाय धुवून पूजा केली. तसेच नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे यांनी भेट घेऊन रोख 50 हजार रुपयांची मदत दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com