Latur APMC Election : लातूर बाजार समितीत देशमुखांचाच आवाज, भाजपला एन्ट्री नाहीच..

Market Committee : लातूर बाजार समिती ही राज्यात पहिल्या टॉप ५ मध्ये असलेली बाजार समिती आहे.
Latur APMC Election News
Latur APMC Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्यातील अग्रेसर समजल्या जाणाऱ्या (Latur APMC Election ) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व १८ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर विरोधी भाजपच्या पॅनलचे सर्व १८ उमेदवार पराभूत झाले आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी लातूरचे देशमुख बंधू आणि भाजपच्या संभाजी पाटील निलंगकेर यांच्यास जिल्ह्यातील नेत्यांनी शक्तीपणाला लावली होती.

Latur APMC Election News
Palghar APMC Election: पालघरमध्ये आघाडीनं झेंडा रोवला ; शिंदे गटाचा सुपडा साफ

मात्र मतदारांनी देशमुखांवरच पुन्हा विश्वास दाखवत त्यांच्याकडे एकहाती सत्ता सोपवली. माजी मंत्री दिलीप देशमुख, (Amit Deshmukh) आमदार अमित देशमुख, (Dhiraj Deshmukh)आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली. या निवडणुकीत मतदारांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना साफ नाकारले. काँग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सोसायटी मतदार संघातील उमेदवार जगदीश बावणे, श्रीनिवास शेळके, लक्ष्मण पाटील, युवराज जाधव, आनंद पाटील, आनंद पवार, तुकाराम गोडसे.

महिला मतदार संघात सुरेखा पाटील, लतिका देशमुख, इमाव मतदार संघात सुनिल पडीले, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात सुभाष घोडके, ग्रामपंचायत मतदार संघात अनिल पाटील, शिवाजी देशमुख, अनुसुचीत जाती मतदार संघात बालाजी वाघमारे, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक मतदार संघात सचिन सुर्यवंशी, व्यापारी मतदार संघ बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, हमाल तोलारी मतदारसंघात शिवाजी कांबळे हे (Marathwada)सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले.

तर विरोधकांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे विरोधकांना धोबीपछाड करण्यात सत्ताधारी काँग्रेसला यश आले. लातूर बाजार समिती ही राज्यात पहिल्या टॉप ५ मध्ये असलेली बाजार समिती असून लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या बाजार समितीने अतिशय काटेकोर अंमलबजावणी करून पारदर्शक कारभार केला आहे. त्याची ही पावती मतदारांनी दिली असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com