BJP News : लातूरमध्ये भाजपामध्ये 'हम साथ साथ है' चे चित्र! 'स्थानिक' साठी स्वबळाचा नारा..

BJP leaders in Latur present a united front under the banner of 'Hum Saath Saath Hain', yet assert a go-it-alone strategy for the upcoming local self-government elections. : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पक्षांतर्गत गटबाजी आणि वादाचा फटका बसला होता.
Latur BJP News
Latur BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur Political News : भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचा कार्यक्रम संपल्यानंतर नवनिर्वाचित शहर व जिल्हाध्यक्षांकडून स्वबळाची भाषा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सुरूवातीला महायुती म्हणून एकत्र लढण्यावर ठाम असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून आता कुठे मैत्रीपूर्ण तर कुठे स्वबळाची भाषा वापरली जात आहे. लातूर शहर व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर आणि बसवरात पाटील मुरुमकर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत मित्र पक्षांना झटका देत स्वबळावर लढण्याची भाषा केली.

जिल्ह्यातील पदाधिकारी, भाजप (BJP) कार्यकर्त्यांची इच्छा ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र लढण्याची आहे. तशी आमची तयारीही आहे, परंतु वरिष्ठांनी एकत्र लढण्याचा आदेश दिला तर मग आम्हाला मित्र पक्षांनासोबत घ्यावे, लागेल असेही बसवराज पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. नवे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते एका व्यासपीठावर दिसले. संभाजी पाटील निलंगेकर, रमेशअप्पा कराड, अभिमन्यू पवार हे तीनही आमदार एकत्र आल्याने भाजप कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला असावा.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पक्षांतर्गत गटबाजी आणि वादाचा फटका बसला होता. लातूर (Latur) शहरची जागा अवघ्या आठ हजार मतांनी निसटली. त्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत जिल्ह्यातील सगळ्या आमदारांनी व त्यांच्या समर्थकांनी एकत्र येऊन काम करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील हे 'हम साथ साथ है'चे चित्र सुखावणारे होते.

Latur BJP News
Babanrao Lonikar-Raosaheb Danve : मी अन् रावसाहेब दानवेंनी ठरवलं तर जालना महापालिका ताब्यात घेऊ शकतो! लोणीकरांचा दावा..

अजित पाटील कव्हेकर आणि बसवराज पाटील यांनी शहर व जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाने मरगळ झटकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असा स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे. यावर वरिष्ठांची नेमकी मर्जी काय? हे लवकरच स्पष्ट होईल.

Latur BJP News
Latur Water Issues : लातूरच्या नेत्यांकडून उजनीच्या पाण्याचे नुसतेच राजकारण!

पक्षात नव्या जुन्याचा वाद नाही, असे स्पष्ट करतांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी त्याचा भाजपवर परिणाम होणार नाही, असे बसवराज पाटील यांनी स्पष्ट केले. लातूर आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि निलंगा येथे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्याचे भुमीपूजन लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची महातिली यावेळी देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com