Latur News: ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 11 उमेदवारांनी घेतला मोठा निर्णय

Renapur Nagar Panchayat Election 2025: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकारी, नेते, उमेदवार यांना पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या,पण पक्षाकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याची भावना उमेदवारांमध्ये होती.
Uddhav Thackeray , Local Body Election
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Latur News: नगरपंचायत निवडणुकीला आठ दिवस शिल्लक असतानाच रेणापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याने ठाकरेसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान प्रक्रियेत तटस्थ राहणार असल्याचे या उमेदवारांनी माध्यमांना सांगितले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेसेनेच्या 11 उमेदवारांनी माघार घेत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने रेणापूरची राजकीय समीकरणे बदलली आहेत.शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकारी, नेते, उमेदवार यांना पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या,पण पक्षाकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याची भावना उमेदवारांमध्ये होती. यामुळे निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहण्याचे या उमेदवारांनी पसंत केले.

2016 मध्ये रेणापूर नगरपंचायतीची स्थापना झाली. 2017मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर तीन वर्ष प्रशासकाचा कालावधी गेला. यंदाच्या निवडणुकीत चौरंगी लढत निर्माण झाली आहे.

Uddhav Thackeray , Local Body Election
Maharashtra Government: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! डिसेंबरमध्ये ‘ही’ प्रमुख मागणी मान्य होणार

दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी मुख्य लढत रेणापूरमध्ये होणार होती. ठाकरेसेनेच्या 11 उमेदवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अन्य पक्षांना नवी रणनीती आखावी लागत आहे.

हे 11उमेदवार जरी निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहत असले तरी ते मतदानाच्या दिवशी कुणाला छुपा पाठिंबा देतात, यावर अन्य उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.ठाकरेसेनेच्या 11 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडमोडी घडत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com