Latur: सत्कार बसवराज पाटलांचा, संभाजी निलंगेकरांच्या टार्गेटवर अमित देशमुख : लातूर जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी टाकला शब्द

Latur DCC Bank, Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukh: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चौकशी करून प्रशासक नेमावा, त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी देशमुख कुटुंबावर जोरदार टीका केली.
Amit Deshmukh, Sambhaji Patil Nilangekar
Amit Deshmukh, Sambhaji Patil NilangekarSarkarnama
Published on
Updated on

Latur DCC Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चौकशी लावा, तिथे प्रशासक नेमा आणि मग निवडणुका घ्या, बघा कसा चमत्कार घडतो अन् यांचे डिपॉझीट जप्त होते, अशा शब्दात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित, धीरज आणि दिलीपराव देशमुख या काका पुतण्यांवर निशाणा साधला. हे लोक लबाड आहेत, शेतकर्‍याला एक रुपयाचे कर्ज दिले नाही, जे कर्ज वाटप केले ते कसे केले? कोणाला केले? याची चौकशी झाली पाहिजे. या तीनही देशमुखांच्या गाडीत पेट्रोल-डिझेल सुद्धा स्वत:च्या खिशातील पैशातून टाकले जात नाही, तर जिल्हा बँकेच्या तिजोरीतून, शेतकर्‍यांच्या पैशातून जाते, असा घणाघात निलंगेकर यांनी केला.

लातूर-धाराशीव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार समारंभ लातूर भाजपाच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात संभाजी पाटील निलंगेकर हे अमित देशमुख आणि काँग्रेस पक्षावर तुटून पडले. अमित, धीरज आणि दिलीपराव देशमुख यांना आव्हान देताना मा‍झ्या प्रश्नांची उत्तरे द्या, तुम्ही ती कधीच देऊ शकणार नाहीत. मोकळ्या वातावरणात जिल्हा बँकेच्या निवडणुका घ्या, तुमचे डिपॉझीट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारीही संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला.

Amit Deshmukh, Sambhaji Patil Nilangekar
Latur: दिवंगत विलासराव देशमुखांच्या भावाचे अन् भाजप आमदाराचे 'सूर' जुळले : मराठवाड्यातील 'साखरे'च्या राजकारणात नवा ट्विस्ट

दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवर अमित देशमुख यांच्या नावाचा चेक तुम्ही तीन वेळा लातूर मधून पास केला. आता चौथ्यांदा करू नका, हे लबाड लोक आहेत. एकमेकांमध्ये भांडण लावायची, संभ्रम निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हेच काम आतापर्यंत देशमुखांनी केल्याचा आरोप निलंगेकरांनी केला. निलंग्यातील एका लग्नात अमित देशमुख यांनी माझा हातात हात घेतला, गळा भेट घेतली. मला म्हणाले, अभिमन्यू पवार यांचे निंलग्यावर किती लक्ष आहे बघितले का? त्यांनी सोयरीक सुद्धा निलंग्यातच केली आहे? तुम्ही सावध राहिलं पाहिजे. मी म्हणालो, काळजी करू नका, माझी बायको देशमुखांचीच आहे, असा किस्सा निलंगेकर यांनी सांगीतला.

लातूर जिल्हा बँक गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस आणि देशमुख कुटुंबाच्या ताब्यात आहे. निलंग्याचा एकमेव संचालक तिथे विरोधात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इतरांना लढूच दिले जात नाही. आमच्या निलंग्यात ७० सोसायटी असताना फक्त पाच जणांना निवडणूक लढवता आली. सोयीनुसार नियम तयार करायचे, निवडणूकीत अ वर्ग सोसायटीच्या व्यक्तीलाच निवडणूक लढवता येते, एवढेच नाही तर त्याचा सूचक हा देखील अ वर्ग सोसायटीचाच हवा असे हे नियम.

मोकळेपणाने कधी तरी जिल्हा बँकेची निवडणूक होऊ द्या, माझे स्वत:ला मीस्टर क्लिन म्हणवून घेणार्‍या अमित देशमुख यांना आव्हान आहे, तुमचे डिपॉझीट जप्त केले नाही तर नाव सांगणार नाही, असा गर्भित इशाराच निलंगेकर यांनी दिला. देशमुख कुटुंबांनी स्वत:च्या कारखान्यांना कायम झुकते माप दिले, इतरांचे कारखाने बंद पाडण्याचे पाप त्यांचेच आहे.

Amit Deshmukh, Sambhaji Patil Nilangekar
Aurangabad District Bank: जिल्हा बँकेत राजकीय ट्विस्ट! मंत्री सावेंची शिवसेनेला अडचणीत आणणारी खेळी,अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्र्यांचं वजन वापरणार

पण आता बसवराज पाटील हे आपल्याकडे आले आहेत. देशमुख कुटुंबाची सगळी कुंडली त्यांच्याकडे आहे. त्यामुळे लातूर बँक ताब्यात घेण्यासाठी आणि त्याच्या निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी आधी या बँकेची चौकशी लावा, प्रशासक नेमा आणि मग निवडणुका घ्या, असे आवाहन निलंगेकर यांनी केले. जिल्हा बँक भाजपाच्या ताब्यात घेतल्याशिवाय आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार पूर्ण होणार नाही, असेही निलंगेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com