Aurangabad District Bank: जिल्हा बँकेत राजकीय ट्विस्ट! मंत्री सावेंची शिवसेनेला अडचणीत आणणारी खेळी,अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्र्यांचं वजन वापरणार

BJP Vs Shivsena: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर सावे यांना धुरंधर म्हणून संबोधले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे कमळ फुलवल्यानंतर सहकार क्षेत्रातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही भाजपाने 20 पैकी सात संचालक निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली.
Atul Save Aurangabad District Bank
Atul Save Aurangabad District Bank Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुकींमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपाला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मंत्री अतुल सावे यांचे मुख्यमंत्री दरबारी वजन चांगलेच वाढले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर मंत्री अतुल सावे यांना धुरंधर म्हणून संबोधले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे कमळ फुलवल्यानंतर सहकार क्षेत्रातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही भाजपाने 20 पैकी सात संचालक निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली.

या निवडणुकीत महायुतीने एकत्रित पॅनल तयार करून निवडणूक लढवली होती. 8 संचालक बिनविरोध निवडून आणल्यानंतर 12 संचालकांसाठी निवडणूक पार पडली. यातही महायुतीने 11 जागा जिंकल्या, तर केवळ एक जागा महाविकास आघाडीच्या पॅनलला मिळाली. या एकतर्फी विजयात मंत्री अतुल सावे यांची रणनीती उमेदवारांची निवड याचाही मोठा वाटा होता.

आता 20 जुलै रोजी अध्यक्ष निवडण्यासाठी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अतुल सावे यांनी भाजपाच्या संचालकांना सोबत घेत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Atul Save Aurangabad District Bank
Vinod Tawde News: खडसेंची घरी जाऊन भेट, आता विनोद तावडेंचा फडणवीसांच्या CM पदाबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,'15 वर्षांपूर्वी मीच त्यांना...'

जिल्हा बँकेतील यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सावे यांना शाबासकी दिली. 20 पैकी 19 संचालक आणि त्यात 9 जागांसह मित्रपक्ष शिवसेना मोठा भाऊ ठरल्यानंतर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावर जोरदार खल सुरू झाला आहे. अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असे विजयानंतर अतुल सावे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार भाजपाच्या नवनिर्वाचित संचालकांसह सावे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची व निर्णायक मानली जात आहे.

महापालिका, जिल्हा परिषदेत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता जिल्ह्याच्या राजकारणासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जिल्हा बँकही आपल्या ताब्यात ठेवण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. अडीच अडीच वर्ष अध्यक्ष पदाचा फाॅर्म्युला ठरवण्यात आल्याची चर्चा असली तरी पहिली टर्म कोणाला? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. जिल्हा परिषद, महापालिकेत बॅकफुटवर गेलेल्या शिवसेनेने पहिली टर्म आपल्याला मिळावी, यासाठी जोर लावला आहे.

Atul Save Aurangabad District Bank
NCP BJP alliance : पुण्यात मोठी घडामोड; विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाणार, उपमहापौर पदावर डील? माजी खासदाराने टाकला डाव...

आमदार अब्दुल सत्तार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत तसा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना त्यांच्याच पक्षातून खासदार संदीपान भुमरे यांच्याशी स्पर्धा करावी लागणार असे चित्र आहे. हे दोन्ही नेते आपल्या मुलाला जिल्हा बँकेचा अध्यक्ष करू पाहत आहेत.

आमदार विलास भुमरे, समीर सत्तार हे बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. शिवसेनेत एकमत झाले नाही, तर भाजपा पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष पदावर दावा सांगू शकते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत निश्चितच अध्यक्ष पदावर चर्चा झाली असेल असे बोलले जाते.

Atul Save Aurangabad District Bank
Shirish Chaudhari: भाजप आमदाराचे बनावट लेटरहेड प्रकरण: शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक कधी? राष्ट्रवादी आमदाराचा सवाल

विशेष म्हणजे भाजपाच्या नवनिर्वाचित संचालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ही भेट ग्रेट भेट होती, अशी प्रतिक्रिया सावे यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, सुहास शिरसाठ, माजी आमदार नितीन पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, वैजापूर नगराध्यक्ष दिनेश परदेशी, रामूकाका शेळके, संजय जाधव, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अनिल बोरसे, प्रभाकर काळे, माजी जि.प.सदस्य किशोर बलांडे, माजी जि.प.सदस्य संदीप पाटील,अर्जुन पाटील, दिलीप बनकर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com