Latur Congress : खासदार काळगेंच्या आभार दौऱ्याच्या बॅनरमधून निलंगेकर गायब...

Shivaji Kalge And Ashok Patil Nilangekar : लातूर लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहातच नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी आजपासून आभार दौरा सुरू केला आहे.
Ashok Patil Nilangekar, MP Shivaji Kalge
Ashok Patil Nilangekar, MP Shivaji KalgeSarkarnama

Latur News, 15 June : लातूर लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहातच नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी आजपासून आभार दौरा सुरू केला आहे. दुपारी चार वाजता निलंगा येथे होणाऱ्या या आभार दौऱ्यासाठी शहरांमध्ये बॅनरबाजी आणि कमानी उभारण्यात आल्या आहेत.

मात्र यातून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांचे फोटो गायब असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काळगे यांना निलंगा विधानसभा मतदारसंघातून वीस हजाराहून अधिक मतांचे लीड मिळाले आहे.

भाजपचे (BJP) माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली ही आघाडी महत्त्वाची मानली जात आहे. याच मतदारसंघात अशोक पाटील निलंगेकर व संभाजी पाटील निलंगेकर या काका-पुतण्यांच्या राजकीय संघर्षाचा अंकही लिहिला गेला आहे. अशावेळी काँग्रेसने या मतदारसंघात आघाडी घेणे महत्त्वाचे समजले जाते. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जाते.

या पार्श्वभूमीवर आज निलंगा येथे होत असलेल्या खासदार काळगे यांच्या आभार दौऱ्याला महत्त्व आले आहे. परंतु दौऱ्याआधीच काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचं दिसत आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे पुत्र व राजकीय वारस म्हणून अशोक पाटील निलंगेकर यांच्याकडे बघितले जाते.

निलंगा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील विधानसभा निवडणुकीत निलंगेकर यांनी साठ हजार मते घेतली होती. काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांना निलंगा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यात अशोक पाटील निलंगेकर यांचाही मोठा वाटा असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

Ashok Patil Nilangekar, MP Shivaji Kalge
Congress News : लोकसभेतील विजयानं काँग्रेसचा कॉन्फिडन्स 'डबल'; संभाजी पाटील-निलंगेकरांविरोधात इच्छुकांमध्ये चढाओढ

असे असताना खासदार काळगे यांच्या आभार दौऱ्याच्या बॅनरवर त्यांचा फोटो नसल्याने निलंगेकर समर्थक नाराज झाले आहेत. खासदार काळगे स्वतः निलंगा मतदारसंघात येत असताना काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने या बॅनरबाजीतून डोके वर काढले आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या आभार दौऱ्याच्या कार्यक्रमात स्वतः अशोक पाटील निलंगेकर व त्यांचे समर्थक सहभागी होतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ashok Patil Nilangekar, MP Shivaji Kalge
Ajit Pawar : अण्णा हजारेंमार्फत अजितदादांविरोधात भाजपचं मोठं षडयंत्र, कोणी केला आरोप?

लोकसभेतील विजयानंतर निलंगा तालुक्यातील मतदारांचे आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निवडणूक काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार व जनसामान्य जनतेशी जनसंपर्क वाढविण्याच्या उद्देशाने आजचा हा आभार दौरा असणार आहे. दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह येथे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com