Anna Hazare, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Anna Hazare, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar : अण्णा हजारेंमार्फत अजितदादांविरोधात भाजपचं मोठं षडयंत्र, कोणी केला आरोप?

Ajit Pawar And Anna Hazare : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला आहे.

Anil Deshmukh On BJP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. या क्लोजर रिपोर्टला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारेंनी घेतलेल्या भूमिकेवरुन आता विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच आता भाजप लोकांचा वापर करुन पुन्हा त्यांना सोडून देतो अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली.

'दूध देणारी गाय दूध देते तेव्हा तिला खाऊ घालतात आणि दूध देणं बंद केले की तिला कसायकडे पाठवतात,' अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. अजित पवार (Ajit Pawar) आणि अण्णा हजारे प्रकरणावर बोलताना देशमुख म्हणाले, "अजितदादांना क्लिन चिट मिळाली, भाजप किंवा महायुतीसोब गेल्यावर ठरवून केसेस मागे घेतल्या जातात. अण्णा हजारे यांच्यामार्फत भाजपचं हे षडयंत्र सुरू आहे.

आधी आपल्याकडे घ्यायचं आणि नंतर बदनाम करून ससेमिरा लावायचा हा भाजपचा अजेंडा आहे. दूध देणारी गाय दूध देते तेव्हा तिला खाऊ घालतात आणि दूध देणं बंद केले की तिला कसायकडे पाठवतात."

भुजबळ नाराज

यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती शिवाय ते सध्या राज्यसभा आणि लोकसभा न मिळाल्यामुळे नाराज असल्याचा दावाही देशमुख केला. "छगन भुजबळ यांची लोकसभा लढण्याची इच्छा होती, ते वरिष्ठ नेते आहेत, शिवाय त्यांना राज्यसभा का मिळाली नाही माहिती नाही.

Anna Hazare, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Video Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ यांची अस्वस्थता राष्ट्रवादी काँग्रेसला कुठे नेणार?

लोकसभा आणि राज्यसभा न मिळाल्याने ते नाराज आहेत, असा दावा देशमुख यांनी केला. देशमुख यांच्या वक्तव्यावर आता अजित पवार गट आणि महायुतीचे नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com