Latur Loksabha Election : मतांच्या जोगव्यासाठी सावलीतला डॉक्टर उन्हात, तर खासदारांचीही दारोदार पायपीट!

Latur Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीनिमित्त आमदार कराड आणि आमदार धीरज देशमुखांची प्रतिष्ठा पणाला
Dr.kalge
Dr.kalgeSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लातूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाच पुन्हा संधी दिली, तर काँग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. पण ऐन ऊन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना एरवी सावलीत बसून वैद्यकीय सेवा देणारे, काँग्रेसचे शिवाजी काळगे यांना मताचा जोगवा मागण्यासाठी उन्हात पायपीट करावी लागत आहे.

तर भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाही मागील पाच वर्षांत केलेली कामे व भविष्यात विकासकामे करण्यासाठी संधी देण्याची मागणी करत उन्हातच दारोदार फिरावे लागत आहे. दोन्ही उमेदवार प्रत्यक्ष गाठी भेटी , कॉर्नर बैठका, छोटेखानी सभा घेत लातूर ग्रामीण मतदारसंघातील गावात, खेड्यात, तांड्याला भेटी देत मतदारापर्यंत पोहाेचण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr.kalge
Beed Lok Sabha Candidate : तुतारी कोणाच्या हाती; बीडमध्ये सोनवणे की मेटे, आज फैसला?

लातूर ग्रामीण मतदारसंघातून गत विधानसभेला आमदार धीरज देशमुख व आमदार रमेश कराड यांची तगडी लढत होणार असे वातावरण तयार झाले होते. पण अचानक भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे व शिवसेनेचा उमेदवार प्रचाराला फिरकला नसल्यामुळे आमदार देशमुख यांचा एकतर्फी विजय झाला, पण दोन नंबरची मते नोटाला मिळाल्यामुळे याची मोठी चर्चा झाली आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत रमेश कराड यांना विधान परिषदेवर संधी दिली.

यानंतर विकासकामांवरून व मतदारसंघातील निधी आणण्यावरून दोन्ही आमदारात नेहमीच श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीनिमित्त आमदार कराड यांनी भाजपच्या उमेदवारास जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणा केली.

Dr.kalge
Hingoli Loksabha Constituency : हेमंत पाटलांना अपशकुन, आता भाजपचे योगी शाम भारती अपक्ष लढणार..?

तर आमदार धीरज देशमुख काँग्रेसच्या उमेदवारासाठी लातूर ग्रामीणमधून मताधिक्य देण्यासाठी व्यूव्हरचना आखत आहेत. यामुळे दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, दोन्ही आमदार लोकसभेच्या उमेदवारासोबतच मतदारसंघात फिरत आहेत. यात कोण बाजी मारणार याची मोठी चर्चा मतदारसंघात होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com