Latur Lok Sabha Constituency : निलंगेकर यांनी दिलेल्या 'या' गॅरंटीची चर्चा; लातूरकरांना कोणतं स्वप्न दाखवलं?

Lok Sabha Election 2024 : महायुतीचे लोकसभेच्या लातूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेभेचे आयोजन करण्यात आले.
Latur Lok Sabha Constituency
Latur Lok Sabha ConstituencySarkarnama

Latur News : मेडिकल, आयआयटी, इंजिनिअरिंगला सर्वाधिक मुलं कुठून जातात तर लातूरमधून. मग केंद्रीय विद्यापीठ कुठे झालं पाहिजे, असा सवाल करत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या. लातूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाडा वाॅटर ग्रीड, समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवून आणण्यासाठीची योजना आपण दिलीत. (Latest Marathi News)

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा शब्द दिला तो पूर्ण केला. आता फडणवीससाहेब आम्हाला केंद्रीय विद्यापीठ आणि आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा. मी लातूरकरांच्या वतीने तुम्हालाही शब्द देतो की लातूर लोकसभा मतदारसंघातून सुधाकर श्रृंगारे हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे मराठवाड्यातील उमेदवार असतील. एवढेच नाही तर महाराष्ट्रात लातूरचा क्रमांक नंबर एकवर असेल, अशी ग्वाही निलंगेकर यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Latur Lok Sabha Constituency
Supriya Sule News : बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना आणखी एक धक्का, भोरचे शहराध्यक्ष अजित पवारांच्या गोटात !

महायुतीचे लोकसभेच्या लातूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेभेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी बोलताना संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यासपीठावर आगमन होताच आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.

लातूर जिल्ह्यात कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. गेली अनेक वर्षे आम्ही काम करतो, पण विकासकामात कधी राजकारण येऊ दिले नाही. लातूरचा पाणी प्रश्न अमित देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांना सोडवता आला नाही. पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्यासाठी वाॅटर ग्रीड योजना आणली, समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवून आणण्यासाठीची योजना आखली.

Latur Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : शरद पवारांचे उमेदवार भगरे खरोखरच सामान्य, त्यांच्याकडे फक्त 'एवढ्या' लाखांची संपत्ती!
Latur Lok Sabha Constituency
Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी सुरू झाली. यातून आता हजारो लातूरकर तरुणांच्या हाताला काम मिळेल. आता आम्हाला केंद्रीय विद्यापीठ, एम्स, आयआयटी सारख्या संस्था द्या. लातूरकरांच्या वतीने ही जागा मराठवाड्यातच नाही, तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा शब्द देतो, असेही निलंगेकर म्हणाले. आमचा आवाज दिल्ली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापर्यंत तुम्हीच पोहाेचवू शकतात, असेही निलंगेकर यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com