Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकदम ‘वीक’ वाटणारी शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकदम स्ट्राँग दिसून येत आहे.
Uttam Jankar-Narayan Patil- Sanjay kokate-sanjay kshirsagar
Uttam Jankar-Narayan Patil- Sanjay kokate-sanjay kshirsagarSarkarnama

Solapur, 25 April : लोकसभा निवडणुकीचा अनेक राजकीय घडामोडी घडत असून, डाव-प्रतिडाव टाकले जात आहे. लोकसभा निवडणुकीतून अनेकजण विधानसभेची गणितं पक्की करताना दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे खिळखिळ्या झालेल्या शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीचे ‘टॉनिक’ मिळाले असून, सोलापूरच्या मोहिते पाटलांसह अनेक बडे नेते पवारांच्या गळाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत विधानसभेची गणितं लक्षात घेऊन अनेकजण आता ‘पेरणी’ करताना दिसून येत आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात तरी सुगीचे दिवस दिसत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील ( Madha Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आणि अकलूजच्या मोहिते पाटील यांनी भाजपपासून फारकत घेतली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharadchandra Pawar) प्रवेश करून माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला फलटणच्या नाईक निंबाळकर कुटुंबीयांसह अनेक बड्या नेत्यांनी साथ दिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक, माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनीही मोहिते पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, तोही विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेला मोहिते पाटील यांना साथ द्यायची आणि विधानसभेला उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना मदत करायची, असे दोघांच्या सोयीचे राजकीय गणित दोन्ही गटांकडून मांडले गेले आहे. त्यामुळे जानकर हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची आगामी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. माळशिरसमध्ये जानकर यांच्या माध्यमातून पवारांच्या हाती विधानसभेसाठी एक स्ट्रॉंग उमेदवार असणार आहे. मोहिते पाटलांची प्रामाणिक साथ मिळाली तर जानकर हे माळशिरसचे आमदार होऊ शकतात.

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्या (ता. २६ एप्रिल) प्रवेश होणार आहे. नारायण पाटील हे मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळखले जातात. नारायण पाटील यांचा मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या 5 हजार 494 मतांनी निसटता पराभव झाला आहे. त्यामुळे नारायण पाटील यांनी विधानसभेसाठी पुन्हा शड्डू ठोकला आहे.

गेली 25 वर्षे भाजपमध्ये काम करणारे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहोळचे संजय क्षीरसागर यांनीही बुधवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत क्षीरसागर यांना 53 हजार 573 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी दोन हात करत मोहोळच्या क्षीरसागर यांनी तालुक्यात भाजप वाढवला. मात्र, भाजपच्या सत्तेच्या काळात त्यांना डावलण्यात आल्याने संजय क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणे पसंत केले आहे. त्यांनीही मोहोळमधून विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केलेली आहे.

Uttam Jankar-Narayan Patil- Sanjay kokate-sanjay kshirsagar
Lok Sabha Election 2024 : उन्हाने तापलात, आता मनाने तापा अन् भुमरेंना माझ्यासोबत संसदेत पाठवा...

माढ्यातून संजय कोकाटे यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेशाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या उमेदवारीबाबत सूतोवाच केले आहे. ऐनवेळी एखादे मोठे नावही माढा विधानसभेसाठी येऊ शकते. तसेच, मित्रपक्ष असलेल्या शेकापमधील दोन देशमुख बंधूमधील वादही मिटविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकदम ‘वीक’ वाटणारी शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकदम स्ट्राँग दिसून येत आहे.

R

Uttam Jankar-Narayan Patil- Sanjay kokate-sanjay kshirsagar
Solapur Politics : फडणवीसांनी मला एक महिना भेट दिली नाही; निष्ठावंत क्षीरसागरांच्या अश्रूंचा बांध फुटला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com