Latur Loksabha Constituency : सून भाजपात, सासरे काँग्रेसनिष्ठ; शिवराज पाटील-चाकूरकरांचा आशीर्वाद कोणाला ?

Loksabha Election 2024 : अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशामागे राजकीय दबाव हे कारण सांगितले जाते. मात्र स्वतः अर्चना पाटील यांनी मात्र गेल्या पाच-सहा वर्षापासून आपला भाजपमध्ये जाण्याचा विचार होता असे सांगत दबावाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
 shivraj patil chakurkar Archana Patil
shivraj patil chakurkar Archana Patil

Latur Political News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा सात वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डाॅ. अर्चना पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मराठवाड्यातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 shivraj patil chakurkar Archana Patil
Lok Sabha Election 2024 News : महायुतीच्या 9 तर आघाडीच्या 7 जागांचा तिढा सुटेना; 16 लढती अद्याप अस्पष्टच...

सून भाजपमध्ये आणि सासरे काँग्रेसशी एकनिष्ठ अशावेळी लातूर लोकसभा मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकरांचा आशिर्वाद कोणाला? याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. अर्चना पाटील (Archana Patil ) यांच्या भाजप प्रवेशामागे राजकीय दबाव हे कारण सांगितले जाते. मात्र स्वतः अर्चना पाटील यांनी मात्र गेल्या पाच-सहा वर्षापासून आपला भाजपमध्ये जाण्याचा विचार होता असे सांगत दबावाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता जिल्ह्यातील काँग्रेसचे (Congress) मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरातच दोन पक्षाची विचारसरणी दिसून येते. अर्चना पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व स्थानिक भाजप नेत्यांनी नुकतीच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचेही बोलले जाते. त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांची नेमकी भूमिका काय? यावर खल सुरू झाला आहे.

भाजपामधील वरिष्ठ नेते व खासदार सुधाकर शृंगारे हे शिवराज पाटील चाकूरकर यांचा अशिर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. शिवाजी काळगे हे चाकूरकरांचा आशिर्वाद मलाच असल्याचा दावा करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाकडून चाकूरकरांचा पाठिंबा आपल्याचा या दावेदारीने सर्वसामान्य मतदार मात्र संभ्रमात आहेत.

शिवराज पाटील चाकूरकर यांनी मात्र आपला आशिर्वाद नेमका कोणाला याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. लातूर लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने शिवाजी काळगे या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.

आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांच्याकडून त्यांच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. तर, दुसरीकडे महायुतीचे श्रृंगारे यांचा प्रचार आता कुठे वेग घेऊ लागला आहे. भाजपला या मतदारसंघात सलग तिसरा विजय मिळवून हॅट्रीक साधायची आहे. तर काँग्रेसला भाजपला रोखून ही जागा पुन्हा खेचून आणायची आहे.

(Edited By Roshan More)

 shivraj patil chakurkar Archana Patil
Eknath Khadse: नाथाभाऊंचा भाजप प्रवेश; रोहितदादा म्हणाले, "तर खडसेंनाही तुरुंगात टाकलं असतं..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com