Lok Sabha Election 2024 News : महायुतीच्या 9 तर आघाडीच्या 7 जागांचा तिढा सुटेना; 16 लढती अद्याप अस्पष्टच...

Political News : दोन महिन्यांपासून सुरू असलेला महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने जवळपास राज्यातील 48 पैकी 16 लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्टच आहे.
Mahavikas  Aghadi - Mahayuti
Mahavikas Aghadi - MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 22 दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यापूर्वी दोन महिन्यांपासून सुरू असलेला महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने जवळपास राज्यातील 48 पैकी 16 लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्टच आहे. याठिकाणाच्या जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यास विलंब होत आहे.

महाविकास आघाडीने अद्याप सात जागेवरील उमेदवार जाहीर केले नाहीत तर महायुतीने (Mahayuti) जवळपास 9 जागांवरील उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळे या जागांवरील जागावाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः काही जागांवर महायुती व महाविकास आघाडीतील (MVA) दोन-तीन पक्षाने दावा केला असल्याने या जागांवरील उमेदवार फायनल झाले नसल्याचे समजते. ( Lok Sabha Election 2024 News)

Mahavikas  Aghadi - Mahayuti
Anandraj Ambedkar News : आनंदराज आंबेडकरांची कोलांटउडी; म्हणाले, 'निवडणूक लढवणारच!'

धुळे महाविकास आघाडीतील माढा, रावेर, जालना, उत्तर मुंबई, मुंबई दक्षिण मध्य, धुळे, दिंडोरी या लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेली नाहीत. या जागावरून आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात मतभेद आहेत.

महायुतीमध्ये सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मध्य मुंबई, दक्षिण मुंबई येथील उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. या जागांवरून महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात काही जागांवरून वाद असल्याने काही ठिकाणचे उमेदवार ठरले नसल्याने घोषणा बाकी आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार फायनल झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढच्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याने आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या जागांवरील उमेदवार घोषित करावे लागणार आहेत.

तिसरा टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर मतदान 7 मे ला होणार आहे. त्यामध्ये राज्यातील धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.

Mahavikas  Aghadi - Mahayuti
MVA News : घोळ मिटला, जागावाटप ठरले; मविआच्या बैठकीत नेमके काय घडले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com