Latur ZP Reservation News : लातूर जिल्हा परिषदेतील एन्ट्रीसाठी इच्छूक कामाला, आरक्षणामुळे संधी हुकलेले पर्यायांच्या शोधात!

Local Body Reservation Marathwada : लातूर जिल्हा परिषदेचे 58 गट होते. पण आगामी निवडणुकीसाठी एक गट वाढून ही संख्या आता 59 झाली आहे.
Latur ZP Election Reservation News
Latur ZP Election Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीची चाहूल लागताच अनेक इच्छूकांनी प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे.

  2. मागील निवडणुकीत संधी हुकलेले काही नेते आता नव्या पर्यायांच्या शोधात सक्रिय झाले आहेत.

  3. स्थानिक राजकारणात नव्या चेहऱ्यांना आणि युवकांना पुढे येण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Local Body Election 2025 : लातूर जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणासाठीचे आरक्षण काल जाहीर झाले. ज्याचे गट कायम राहिले ते उत्साहाने कामाला लागले आहेत. तर ज्यांच्या आशेवर आरक्षणामुळे पाणी फिरले ते पर्यायाच्या शोधात आहेत. एकूणच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर निवडणूक तयारीला वेग आल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या 59 गटाचे आरक्षण काल जाहीर झाले.

आरक्षण (Reservation) जाहीर झाल्याने आता राजकीय गणिते घालण्यास सुरवात झाली आहे. आरक्षणानंतर काहींचा भ्रमनिरास झाला तर काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पक्षश्रेष्ठींकडे आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल याकरिता फिल्डिंग लावली जात आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत चक्राकार पद्धतीने आरक्षण काढले जात होते. पण या निवडणुकीपासून पहिल्यापासून आरक्षणाला सुरवात झाली आहे. त्यामुळे हे आरक्षण काढताना मागील आरक्षणाचा विचार करण्यात आला नाही.

लातूर (Latur) जिल्हा परिषदेचे 58 गट होते. पण आगामी निवडणुकीसाठी एक गट वाढून ही संख्या आता ५९ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण गेल्या महिन्यात मुंबईत जाहीर झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि दहा पंचायत समितीच्या 118 गणासाठीचे आरक्षण सोमवारी त्या त्या पंचायत समित्यांमध्ये जाहीर करण्यात आले आहे. तर गटाचे आरक्षण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले.

Latur ZP Election Reservation News
Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पुन्हा लांबणीवर? कोर्टात सरकारविरोधात याचिका

यात पहिल्यांदा लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गाचे आरक्षण तीन लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून जाहीर करण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणासंदर्भात कोणाला आक्षेप असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात घ्यावेत, ते आक्षेप विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Latur ZP Election Reservation News
Lohara ZP Election Reservation : लोहारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे चारही गट पुन्हा महिला राखीव, पुरूषांना धक्का!

गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण

सर्वसाधारण- हाडोळती, अंधोरी (ता. अहमदपूर), वांजरवाडा (ता. जळकोट), तोगरी (ता. उदगीर), जवळगा (ता. देवणी), नळेगाव (ता. चाकूर), एकुर्गा (ता. लातूर), खरोसा, उजनी, किल्लारी (ता. औसा), निटूर, अंबूलगा बु, दापका, हलगरा, कासारसिरसी (ता. निलंगा),

सर्वसाधारण महिला- माळहिप्परगा (ता. जळकोट),

वलांडी (ता. देवणी), खरोळा, कामखेडा, पोहरेगाव (ता. रेणापूर), आर्वी, हरंगूळ बु., काटगाव ( ता. लातूर), लोदगा, आशिव, मातोळा (ता. औसा), लांबोटा, औराद शहाजानी, मदनसुरी, सरवडी (ता. निलंगा)

अनुसूचित जाती--शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर), निडेबन, लोहारा, हेर (ता. उदगीर), साकोळ (ता. शिरुर अनंतपाळ), महाराणा प्रतापनगर (ता. लातूर)

अनुसूचित जाती महिला--गुत्ती (ता. जळकोट), सोमनाथपूर, नळगीर (ता. उदगीर), येरोळ (ता. शिरुर अनंतपाळ), रोहिणा (ता. चाकूर), निवळी (ता. लातूर)

अनुसूचित जमाती-सावरगाव रोकडा (ता. अहमदपूर)

अनुसूचित जमाती महिला-तांबाळा (ता. निलंगा)

नागरिकांचा मागास प्रवर्ग-वाढवणा (ता. उदगीर), बोरोळ (ता. देवणी), जानवळ, वडवळ (ता. चाकूर), पानगाव (ता. रेणापूर), भातांगळी, तांदूळजा (ता. लातूर ),

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- खंडाळी, किनगाव (ता. अहमदपूर), चापोली (ता. चाकूर), पाखरसांगवी, मुरुड (ता. लातूर) लामजना, आलमला, भादा (ता. औसा).

1. लातूर जिल्हा परिषद निवडणुका केव्हा होणार आहेत?
अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी येत्या काही महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

2. कोणत्या पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे?
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच काही अपक्ष उमेदवारांकडून तयारी सुरू आहे.

3. या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल का?
होय, अनेक स्थानिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या नव्या उमेदवारांना या निवडणुकीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

4. मागील निवडणुकीत पराभूत झालेले नेते पुन्हा प्रयत्न करत आहेत का?
काही पराभूत नेते नव्या पक्षाच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करत आहेत.

5. लातूर जिल्हा परिषद निवडणूक का महत्वाची मानली जाते?
लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थानिक विकासाच्या योजना आणि निधी वाटपावर परिणाम होतो, म्हणून ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com