OBC Reservation News : मराठा आंदोलकांसाठी रेडकार्पेट अन् आमच्या आंदोलनाकडे मात्र...; हाकेंनी राज्य सरकारला फटकारले

Political News : सरकारचा मराठा आणि ओबीसी आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. मराठा आंदोलकांसाठी रेडकार्पेट आणि आमच्या आंदोलनाकडे मात्र कानाडोळा अशी भूमिका सरकारची असल्याची टीका हाके यांनी केली.
Laxman Hake
Laxman Hake Sarkarnama

Parbhani News : राज्यातील सगळी साधनसंपत्ती मराठा समाजाकडे आहे, तरीही यांना गोरगरीब मागस समाजाचे आरक्षण ओरबडायचंय, असा आरोप ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. सरकारचा मराठा आणि ओबीसी आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. मराठा आंदोलकांसाठी रेडकार्पेट आणि आमच्या आंदोलनाकडे मात्र कानाडोळा अशी भूमिका सरकारची असल्याची टीका हाके यांनी केली.

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव मागणीसाठी वडीगोद्री येथे दहा दिवसांचे उपोषण केल्यानंतर सरकारने प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नसल्याची ग्वाही दिली होती. पाच मंत्र्यांसह बारा जणांच्या शिष्टमंडळाने सरकारच्या वतीने शब्द दिल्यानंतर हाके, वाघमारे यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर हाके यांनी मराठवाड्यात आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल अभिवादन दौरा सुरू केला आहे. (OBC Reservation News)

या निमित्ताने लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे गुरुवारी (ता. 27) परभणी मध्ये होते. यावेळी ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना आपला विरोध कायम असल्याचे सांगितले. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देताना कुणबी-मराठा अशी खाडाखोड करून ती दिली जात असल्याचा आरोप करत या नोंदी सरकारने तात्काळ रद्द कराव्यात, तसेच प्रमाणपत्रांचे वाटप बंद करावे, अशी मागणीही आपल्या भाषणात केली.

मराठा समाजाच्या आंदोलनाला रेड कार्पेट आणि ओबीसीच्या आंदोलनाकडे कानाडोळा हे राज्य शासनाचे एकतर्फी धोरण आहे. याला ओबीसी समाजाकडून उत्तर दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा हाके यांनी यावेळी दिला. मराठा समाजात जसे गोरगरीब आहेत, त्यापेक्षाही गोरगरीब भटक्या समाजात, ओबीसी समाजात आहेत.

Laxman Hake
Video Vidhanparishad Election News : भाजपकडून विधानपरिषदेसाठी कोणाला लागणार लॉटरी ? शिंदे गट, काँग्रेसकडून 'या' नावांची चर्चा

मराठा समाजाच्या आरक्षणला (Maratha Reservation) ओबीसींनी कधीही विरोध केला नाही. त्यांना ईडब्ल्युएस स्वतंत्र आरक्षण आहे. परंतु, त्यांचा अट्टहास हा ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, असा आहे. ओबीसी आरक्षणाचा बचाव आम्ही प्राणांतिकपणे प्रयत्न करून करू. बनावट कागदपत्रे तयार करून दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द झालीच पाहिजेत, याचा पुनरुच्चारही हाके यांनी केला.

महाराष्ट्रातील सर्व साधनसंपत्ती आज मराठा समाजाकडे आहे, असे असताना त्यांना मागासवर्गीय समाजाचे आरक्षणही ओरबडून घ्यायचे आहे. हे आरक्षण ज्या राज्य घटनेने दिले आहे, त्या राज्य घटनेलाच हे आव्हान देत असून हे अत्यंत दुर्देवी असल्याचे हाके म्हणाले.

Laxman Hake
Video Eknath Shinde On OBC : सरकारच्या धावपळीला यश, हाकेंचं उपोषण स्थगित, पण लढा सुरुच राहणार; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com