MLA Laxman Pawar News : बीडमध्ये महायुतीत खटके, धनंजय मुंडेंवर आरोप करत भाजप आमदाराची टोकाची भूमिका..

Laxman Pawar accuses Dhananjay Munde of BJP-Nationalist controversy in Beed : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या आमदारामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने जिल्ह्यातील पुढचे चित्र काय असेल ? याचा अंदाज येतो.
MLA Laxman Pawar-Dhananjay Munde
MLA Laxman Pawar-Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Mahayuti Political News : विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसे महायुतीत खटके उडायला लागले आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या मतदारसंघात निधी दिला जात नाही, असा आरोप करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आपण किंवा कुटुंबातील कोणीही विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे लक्ष्मण पवार यांनी जाहीर केल्याचे वृत्त एका स्थानिक दैनिकात प्रसिद्ध झाले होते.

त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी यांनी आमदार लक्ष्मण पवार यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले. गेवराई मतदारसंघात भरपूर विकास निधी दिला, पण संबंधित आमदार तो जनतेपर्यंत पोहचवू शकले नसावेत. लोकसभा निवडणुकीत आमदार लक्ष्मण पवार यांनी महायुतीच्या उमेदवाराचे किती काम केले? हा ही प्रश्न आहेच. त्यांनी काम केले असते तर महायुतीच्या उमेदवाराला त्यांच्या मतदारसंघातून लीड मिळाली असती, असा टोला लगावला.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या आमदारामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने जिल्ह्यातील पुढचे चित्र काय असेल ? याचा अंदाज येतो. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत गेवराई मतदार संघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी आपण विधानसभा निवडणुकी मधून माघार घेत आहोत. मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नाही, अशी सडेतोड भूमिका पवार यांनी घेतली होती.

MLA Laxman Pawar-Dhananjay Munde
‘माझ्यासोबत दगाफटका झालाय’, पंकजा मुंडेंनी खंत बोलून दाखवली | Pankaja Munde | BJP | Beed |

सत्तेमध्ये राहून देखील जनतेची कामे होत नसेल तर काही उपयोग नाही, मी किंवा माझ्या परिवारातील कोणीही निवडणूक लढवणार नाही. (Beed) पालकमंत्री माझे ऐकत नाहीत केवळ तीन चांगले अधिकारी सुद्धा माझ्या मतदारसंघाला मिळू शकले नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवले. आमदार पवार यांच्या या आरोपानंतर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पण भाजप आमदाराने टार्गेट केल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही त्यांच्या आरोपांना जशासतसे उत्तर दिले.

गेवराई मतदार संघाला मोठ्या प्रमाणात निधी आम्ही दिला आहे. त्यांनी सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेचे काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे, यात काही तथ्य नाही. मुळात त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा किती प्रचार केला ? मतदारसंघात विकास केला असता तर गेवराई विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला लिड सुद्धा मिळाली असती.

MLA Laxman Pawar-Dhananjay Munde
Dhnanjay Munde On Next Cm News : पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, वर्धापनदिनी मुंडेंचा संकल्प..

पण त्यांनी सरकार मधून घेतलेला निधी हा जनतेपर्यंत पोहोचला की नाही ? हेच कुठेतरी त्यांच्या मनाला लागत असेल. आपण जनतेपर्यंत तो निधी पोहोचू शकलो नाही, हे त्यांना जाणवले असेल, त्यामुळे ते आता निवडणुकीतून माघार घेत असावेत, असा माझा समज आहे, अशा शब्दात मुंडे यांनी पवारांची फिरकी घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com