Beed Collector News : कोयता सोडा, विकासाची कास धरा ; रोहयोतून हाताला काम देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा शब्द..

Collector Beed : मला टाळ्या नको, प्रशंसा नको, मला इथल्या कामगार आणि शेतकऱ्यांची परिस्थिती बदलायची आहे.
Beed Collector News
Beed Collector News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख पुसून आता बीड जिल्हा हा व्यवसायिक आणि विकसनशील शेतकऱ्यांचा बनवायचा आहे, असा संकल्प बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केला आहे. (Beed Collector News) ऊस तोड कामगारांनो कोयता सोडा, विकासाची कास धरा, असे आवाहन करतांनाच रोजगार हमी योजनेतून तुमच्या हाताला काम देवू, असा शब्द जिल्हाधिकाऱ्यांनी ऊसतोड कामगारांना दिला.

Beed Collector News
BJP will contest News : हिंगोली, छत्रपती संभाजीनगर लोकसभा भाजप लढवणार ? केंद्रीय मंत्र्यांचे संकेत..

आपला जिल्हा व्यवसायिक आणि विकसनशील शेतकऱ्यांचा करायचा आहे, ऊस तोडीला जाऊ नका इथेच रहा, प्रशासन तुम्हाला सर्व काही देईल, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. (Beed News) ऊसतोड कामगार महिलांसाठी वडवणी येथे आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. तुम्ही आजोबांच्या काळापासून ऊस तोडणीला जात आहात.

ऊस तोडणीला तुम्ही एकदम पैसे मिळतात म्हणून जाता, मात्र या पैशामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे का ? तुम्ही चांगले घर बांधले का ? शेतजमीन घेतली आहे का? असे प्रश्न त्या विचारत आहेत. (Farmers) तुम्ही इथेच रहा, प्रशासन तुम्हाला आवश्यक त्या सर्व सुविधा देईल. (Marathwada) ऊसतोडणीला जाऊ नका, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी या मेळाव्यातून करत आहेत.

तुम्ही माझ्याकडे ऊस तोडणीला जायचंय, आरोग्याची सुविधा मिळत नाही, असे प्रश्न घेऊन येऊ नका. तर आम्हाला ऊस तोडणीला जायचं नाही, आम्हाला इथेच सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी घेवून या. मी तुमचे सगळे प्रश्न सोडवेन, असा शब्द देखील दिपा मुधोळ या ऊसतोड महिला कामगारांना देत आहेत.

मला टाळ्या नको, प्रशंसा नको, मला इथल्या कामगार आणि शेतकऱ्या परिस्थिती बदलायची आहे. ऊसतोडीतून जेवढे उत्पन्न तुम्ही मिळवताय, त्यापेक्षाही जास्त उत्पन्न तुम्ही इथे रोजगार हमी योजनेच्या कामामधून मिळवाल, असे सांगत जिल्हाधिकारी ऊसतोड कामगार महिलांना आवाहन करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com