Congress Politics : क्रॉस व्होटिंगवरून नांदेडचे मोहन हंबर्डे, अंतापूरकर काँग्रेसच्या रडारवर?

Legislative Council Election Mohanrao Hambarde Jitesh Antapurkar : विधान परिषदेतील क्राॅस व्होटिंगची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. फुटीर आमदारांचा शोध लावला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.
Mohanrao Hambarde Jitesh Antapurkar
Mohanrao Hambarde Jitesh Antapurkar sarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 7 आमदार फुटले. त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या आरोपावरून वातावरण तापले आहे. काँग्रसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी या आमदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावे आम्हाला कळाली आहेत. त्यात नांदेडमधील काही आमदारांचा समावेश असल्याचा दावा वड्डेटीवार यांनी केला आहे. त्यानंतर नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे आणि देगलूर-बिलोलीचे जितेश अंतापूरकर हे पक्षाच्या रडावर आल्याची चर्चा आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. पण जिल्ह्यातील एकही आमदार त्यांच्यासोबत गेला नाही. याबद्दल समाधान व्यक्त केले जात होते. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील या दोन्ही आमदारांभोवती संशयाची सुई फिरताना दिसत आहे. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तर आमदार मोहन हंबर्डे यांच्यावरही अशोक चव्हाण यांचा प्रभाव आहे.

Mohanrao Hambarde Jitesh Antapurkar
Devendra Fadnavis On MLC Election : विधान परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेचाही निकाल सांगितला; म्हणाले...

राजकीय रणनितीचा भाग म्हणून हे दोन्ही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये BJP गेले नसल्याचे बोलले जाते. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांची मते भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्याची चर्चा होती.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फुटीर आमदारांचा शोध लावला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. मुंबईसह नांदेडमधील काही आमदारांची नावे समोर आल्याचेही वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. या आमदारांची यादी पक्षश्रेष्ठीकडे कारवाईसाठी पाठवली असल्याने ती जाहीर करणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही आमदारांकडे संशयाने पाहिले जात आहे. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नावाची चर्चा या फुटीर आमदारांमध्ये होती. मात्र गोरंट्याल यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. वड्डेटीवार यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांचा उल्लेख केल्यामुळे अशोक चव्हाण समर्थक हंबर्डे, अंतापूरकर यांच्याकडेच त्यांचा रोख असल्याचे बोलले जाते.

(Edited By Roshan More)

Mohanrao Hambarde Jitesh Antapurkar
Ajit Pawar Baramati rally : अजितदादांचे बेधडक भाषण; शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर बोलले का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com