Devendra Fadnavis On MLC Election : विधान परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेचाही निकाल सांगितला; म्हणाले...

Mahayuti VS MVA : विधान परिषदेच्या निकालानंतर शिंदे-फडणवीसांनी वाढवलं आघाडीचं टेन्शन
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमदेवारांनी बाजी मारली, तर महाविकास आघाडीचे 3 पैकी 2उमेदवार जिंकले. विधान परिषदेच्या या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी आघाडीच्या नेत्यांना डिवचले. तसेच विजयाची हीच परंपरा विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, विधान परिषदेत जी काही सुरुवात झालेली आहे, तीच विधानसभेतही राहिल. मला विश्वास आहे विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही कायम विजयी होऊ, असे म्हणत फडणीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

भाजपच्या कोट्यातून रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेत उतरवले होते. त्यांच्या विजयाबाबत फडणवीसांनी कौतुक केले. सदाभाऊ खोत हा जनतेचा माणूस आहे. शेतकऱ्यांचा नेता आहे. जनतेसाठी 24 तास राबणारा माणूस आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आमच्या आमदारांनी विश्वास दाखला, तसेच इतर आमदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि त्यांच्या एकूण मतांची बेरीज ही साडे सव्वीस मते मिळाली आहेत, याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले.

Devendra Fadnavis
Milind Narwekar Victory : उद्धव ठाकरेंचे 'राइट हॅन्ड' अन् 'अजातशत्रू' मिलिंद नार्वेकर विजयी!

यावेळी फडणवीसांनी विरोधी पक्षांचा कडक शब्दांत समाचार घेतला. विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde नेतृत्वात महायुतीची 9 जागा निवडून आलेल्या आहेत. जे लोक आम्हाला पराभूत करण्याची भाषा करत होते त्यांची मतेही आम्हाला मिळाली आहेत. आता हीच विजयाची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेतही कायम राखू, असे फडणवीसांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Jayant Patil Loss : शेकापच्या जयंत पाटलांचे 'वाजले 12'; विधान परिषदेत दारूण पराभव, कुणी केला घात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com