MP Fauzia Khan criticized : आंधळेपणामुळे भ्रष्टाचार दिसत नसलेल्या सरकारचा इलाज करू ; फौजिया खान संतापल्या..

Marathwada Political News : रेल्वे, पोलीस, आरोग्य, रस्ते व बांधकाम खात्यात भ्रष्टाचार होत असताना सरकारला तेही दिसत नाही.
Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Ncp Mp Fauzia Khan News ParbhaniSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. (NCP Leader Fauzia Khan) राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतांना त्यांनी खडेबोलही सुनावले. केंद्रातील सरकारला रंग आंधळेपणाचा आजार जडला आहे, त्यामुळे त्यांना सर्वच विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार दिसत नाही. या अपंगत्व आलेल्या सरकारचा आपण डॉक्टर बनून इलाज करू, असा इशाराही फौजिया खान यांनी दिला.

Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Ambadas Danve On Drought : मुख्यमंत्री महोदय, समुद्राचे पाणी दुष्काळी मराठवाड्यात वळवण्याच्या घोषणेचे काय झाले ?

पाथरी येथे आयोजित दिव्यांगांना कृत्रिम उपकरण वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (Parbhani) स्वतःच्या हिताचेच दिसत असलेल्या या सरकारला रंग आंधळेपणाचा आजार झाला आहे. देशभरात सर्वच शासकीय कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असतांना केंद्र सरकारला मात्र ते दिसत नाही. (NCP) खऱ्या अर्थाने या सरकारलाच अपंगत्व आले असून डॉक्टर बनून या सरकारचा इलाज करणार असल्याचे खान म्हणाल्या.

आज सामान्य माणूस भ्रष्टाचाराला कंटाळला आहे. राज्यसभेत आम्हाला कॅगने दिलेल्या माहीतीत संजय गांधी व परीतक्त्या महिलांच्या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. (Marathwada) मात्र सरकार यावर बोलायला तयार नाही, मूग गिळून गप्प आहे. रेल्वे, पोलीस, आरोग्य, रस्ते व बांधकाम खात्यात भ्रष्टाचार होत असताना सरकारला तेही दिसत नाही. खऱ्या अर्थाने या सरकारलाच अपंगत्व आले आहे.

रंग आंधळेपणामुळे त्यांना काहीच दिसत नाही, तेव्हा डॉक्टर बनून आपल्यालाच त्यांचा इलाज करावा लागेल, असेही खान म्हणाल्या. कालच्या चंद्रयान मोहिमेच्या कार्यक्रमात टीव्हीवर कोण दिसत होते? यापूर्वी अनेक मोहीम यशस्वीपणे राबविल्या गेल्या असताना नेहरू अथवा कोणी दिसले होते का ? असा सवाल करत खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिव्यांगाना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com