Aurangabad Political News : पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी मराठवाडा तहानलेलाच आहे. पहिली पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर आहे, पन्नास दिवसांपासून पिकांना पाणी नसल्याने त्यांनी माना टाकायला सुरूवात केली आहे. (Marathwada Drought News) भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मराठवाड्यातील हे भयावह चित्र म्हणजे हा भाग दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याचे दर्शवतो. मग समुद्राचे पाणी मराठवाड्यात वळवून आणण्याच्या वल्गना करणाऱ्यांचे काय? असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका करत त्यांना मराठवाड्यातील दुष्काळाबद्दल असलेल्या काळजीबद्दल शंका उपस्थितीत केली आहे. (Marathwada) मराठवाड्याची भूमी दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभी आहे. पावसाची तूट, साधारण ५० दिवस विना पावसाचे राहिल्याने मका, सोयाबीन सारखी पिके संपल्यात जमा आहेत. भर पावसाळ्यात टँकरवर निर्भर गावांची संख्या शंभरी पार करणार आहे.
गत वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदयांनी समुद्राचे पाणी मराठवाड्याकडे वळवून दुष्काळ संपवण्याची घोषणा केली होती. (Shivsena) हे राजकीय आश्वासन होते बहुदा. कारण या विषयात फार काही ठोस असे झालेले दिसत नाहीत. यातच सरकार दुष्काळ संपवण्यास किती उत्सुक आहे, हे स्पष्ट दिसते, अशा शब्दात दानवे यांनी सरकारला फटकारले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील या भागातील दुष्काळ संपलेला नाही. एकीकडे मोठ्या मोठ्या घोषणा आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही, असे चित्र. या पार्श्वभूमीवर येत्या १६ सप्टेंबर रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पुर्वसंध्येला संभाजीनगरात मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या निमित्ताने दानवे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणांची आठवण करून दिली. ७ वर्षानंतर मराठावाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे.
यापुर्वी ४ ऑक्टोबर २०१६ रोजी संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. सातत्याने कधी कोरडा, तर कधी ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली वावरणाऱ्या मराठवाड्याला अडचणींचा सामना करावा लागतो. मराठवाड्यात पर्जन्यमान कमी झाले आहे, अशावेळी मंत्रीमंडळ बैठकीतून काही भले होते का? की है बैठक केवळ फार्स ठरते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.