Market Committee News : शेतकऱ्यांना निवडणूक लढण्याची संधी दिल्याने अर्जांचा अक्षरशः पाऊस..

Marathwada : शेतकऱ्यांनाही सहकार संस्था आणि ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडणूक लाढविण्याची संधी.
Market Committee Election News
Market Committee Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee News) निवडणूकीसाठी चांगलीच चुरस दिसून येत आहे. सातही बाजार समितीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बाधुंन निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कोरोनामुळे रखडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊसच पडला आहे.

Market Committee Election News
Purna Market Committee News : चोवीस वर्षांपासून सभापती, तरीही अर्ज झाला बाद..

सात बाजार समितीसाठी १३५० अर्जांपैकी बुधवारी (ता.५) झालेल्या छाननीत ८९ अर्ज अपात्र ठरले. (Aurangabad) तर तब्बल १२३३ अर्ज पात्र ठरले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी गुरुवारी (ता.१६) दिली. (Marathwada) कोरोनामुळे जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या.

३० एप्रिलच्या आत निवडणूका घेण्याचे निर्देश न्यायालयाने सहकार विभागाला दिले होते. त्यानुसार राज्यभरासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणूकीत शेतकऱ्यांनाही सहकार संस्था आणि ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडणूक लाढविण्याची संधी असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यातील कन्नड बाजार समिती मतदारसंघातून १८ जागांसाठी २५० अर्ज आले. त्यातील २१ अर्ज अपात्र ठरले. यासह ३ अर्ज हे दोनदा भरण्यात आले होते. तर २२६ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ वैजापूर बाजार समितीच्या १८ जागेसाठी २४२ अर्ज दाखल झाले. यात २३२ अर्ज पात्र तर १० अपात्र ठरले.छत्रपती संभाजीनगर बाजार समितीसाठी २२२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १८१ अर्ज पात्र ठरले. तर १९ अर्ज अपात्र ठरले आहेत. तर २२ अर्ज हे दोनदा दाखल करण्यात आले.

यासह गंगापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी १९६ अर्ज आले होते. पैकी १७९ अर्ज पात्र ठरले तर १४ अपात्र ठरले. २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या संदर्भात गुरूवारी सातही बाजार समिती समोर पात्र-अपात्र उमेदवारीची यादी जाहिर करण्यात आली आहे. आता माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सातही बाजार समित्यांमधील चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आता पुढील दोन आठवडे हे मनधरणीचे ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com