Lok Sabha Election 2024 : निष्ठा अन् माहोल पाहून आदित्य ठाकरे म्हणाले, "ओमदादा जिगर का तुकडा..."

Aditya Thackeray Dharashiv Tour : "ओमदादा जिगर का तुकडा आहे, मला जावंच लागेल."
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Lok Sabha News : सत्ताधारी भाजपची ताकद, मुख्यमंत्रिपद असलेल्या शिवसेनेची रसद, उमुख्यमंत्रिपद असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फळी घेऊन धाराशिवमधून राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील निवडणूक रिंगणात आहेत. ताकदवान महायुतीतीला पराभूत करण्यासाठी ठाकरेंच्या शिलेदाराने अर्थात, ओमराजे निंबाळकरांनी आपल्या 'निष्ठे'ची सारी ताकद रस्त्यावर उतरवून, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंना बोलावून, रोहित पवार आणि अमित देशमुख यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ठाकरे गटाची जाहीर प्रचार सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. या वेळी त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. (Lok Sabha ELection 2024)

Lok Sabha Election 2024
Prithviraj Chavan On NCP : राष्ट्रवादीचा दगा अन् राज्यात भाजपची एन्ट्री; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

"आज आपल्याला ओमराजे यांच्या पाठीमागे उभे राहायचे आहे. माझा ओमदादा उमेदवारी अर्ज भरायला निघाला आहे, मला त्यांच्यासोबत जायचं आहे. माझ्यासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पण मी सांगितलं, 'ओमदादा जिगर का तुकडा आहे, मला जावंच लागेल.' ओमदादा आणि कैलासदादा यांनी सांगितलं की, आदित्यजी तुम्ही महाराष्ट्रात फिरत आहात, महाराष्ट्र दौरा करत आहात तर धाराशिवमध्ये यायची गरज नाही. आमची जबाबदारी आहे, आम्ही हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी ओमराजे (Omraje Nimbalkar) यांचं कौतुक केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election News : राष्ट्रवादीचे धाराशिव, नाशिकचे उमेदवार ठरले; 'या' नावांवर आज शिक्कामोर्तब
Lok Sabha Election 2024
Shiv Sena Thackeray Group: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; ओमराजे निंबाळकर, चंद्रहार पाटील, राजाभाऊ वाजे...

"राज्यात आणि देशात परिवर्तन घडवायचं हे लोकांनी ठरवलं आहे. गद्दार विरुद्ध निष्ठावंतांची ही लढाई आहे. केंद्रीय यंत्रणांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आता मात्र आपल्याला यांना धडा शिकवावा लागेल. ओमदादा आपला खासदार आहे आणि ओमदादाला पुन्हा एकदा दिल्लीत पाठवा. ओमराजेंना पुन्हा निवडून आणायचं आहे," असे आवाहन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com