Lok Sabha Election News : राष्ट्रवादीचे धाराशिव, नाशिकचे उमेदवार ठरले; 'या' नावांवर आज शिक्कामोर्तब

NCP Lok Sabha Candidate : महायुतीमध्ये नाशिक आणि धाराशिवच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती. त्यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
Chhagan Bhujbal, Vikram Kale, Ajit Pawar
Chhagan Bhujbal, Vikram Kale, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election News) लगबग जोरात सुरु आहे. धाराशिवच्या जागेवरून महायुतीची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खलबते सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा अखेर सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीमध्ये (Mahayuti Seat Sharing) धाराशिव, नाशिक हे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला आले आहेत. या जागेवर असलेला तिढा रविवारी रात्री झालेल्या बैठकीत सुटला आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत धाराशिव, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार फायनल करण्यात आले आहेत.

Chhagan Bhujbal, Vikram Kale, Ajit Pawar
Lok Sabha Election 2024: साहेबांचा प्रचार सरकारी बाबूंना महागात पडणार

धाराशिवमधून विधान परिषद सदस्य विक्रम काळे (Vikram Kale) यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे. तर नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी विधान परिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण उपस्थित होते. सोमवारी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभा उमेदवाराची घोषणा करणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव लोकसभेसाठी यावेळी चर्चेत असलेल्या आमदार सतीश चव्हाण, सुरेश बिराजदार, प्रवीणसिंह परदेशी, आमदार विक्रम काळे यांच्या नावावर चर्चा झाली. त्यातून आमदार विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, रायगड, शिरूरमधून उमेदवाराची घोषणा केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपच्या चिन्हावरच महादेव जानकर निवडणूक लढणार आहेत. सोमवारी ते फॉर्म भरत आहेत. तर दुसरीकडे धाराशिव आणि नाशिक हे दोन मतदारसंघ बाकी होते. त्यांचे उमेदवार देखील सोमवारी चार वाजता घोषित होणार आहेत. सोमवारी चार वाजता पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी या दोन उमेदवारांचे नाव घोषित केले जाणार आहेत.

Chhagan Bhujbal, Vikram Kale, Ajit Pawar
Supriya Sule Vs Sunetra Pawar : "भावाची बायको ही आईसमान असते तिचा सन्मान करा अन्...", शिंदे गटाचा सुळेंना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com