AIMIM News : संभाजीनगरची सीट धोक्यात, तरी इम्तियाज जलील छोटे भाई आनंदराज यांच्या मदतीला…

Lok Sabha Election 2024 : जलील यांच्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत असून सध्यातरी चंद्रकांत खैरे यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जलील यांच्यासमोर पुन्हा निवडून येण्याचे मोठे आव्हान आहे.
Imtiaz Jalil, Anandraj Ambedkar
Imtiaz Jalil, Anandraj AmbedkarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : ‘एमआयएम’चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत  आहेत. गेल्या निवडणुकीत ‘वंचित’सोबतच्या आघाडीमुळे दिल्लीत खासदार म्हणून जाण्याची संधी इम्तियाज जलील यांना मिळाली होती. परंतु, यावेळी वंचित बहुजन आघाडीने त्यांची साथ सोडत स्वबळावर ‘एमआयएम’च्या विरोधात उमेदवार दिला आहे.

‘वंचित’मुळे एक गठ्ठा मिळालेली मते दुरावल्यामुळे इम्तियाज जलील (Imtiiaz Jalil) यांची संभाजीनगरची सीट आणि खासदारकी धोक्यात असल्याची चर्चा आहे. पण असे असताना इम्तियाज जलील यांनी मात्र वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना प्रचारासाठी येण्याचा शब्द पूर्ण केला. अमरावती लोकसभा मतदारसंघातील दर्यापूर येथे इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.

Imtiaz Jalil, Anandraj Ambedkar
Eknath Khadse News: एकनाथ खडसेंची भाजप घरवापसी कधी? विनोद तावडे म्हणाले,...

आपल्या आक्रमक भाषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या इम्तियाज यांनी मुस्लिम मतदारांना आंबेडकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी व इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला होता. एवढेच नाही तर आनंदराज आंबेडकर यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यात प्रचार सभा घेण्याचा शब्दही ‘एमआयएम’ने दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानुसार काल दर्यापूर येथे इम्तियाज जलील यांची आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. अमरावतीतील पाठिंब्याच्या बदल्यात आनंदराज आंबेडकर व त्यांची रिपब्लिकन सेना इम्तियाज यांना संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पाठिंबा देणार आहे. या पाठिंब्यामुळे वंचितची काहीसी उणीव भरून निघण्याची आशा एमआयएमला आहे.

काही दिवसांपुर्वी संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी आनंदराज आंबेडकर आले होते. यावेळी दोघांनी सोबत जेवण घेत राजकीय विषयावंर चर्चा केली होती. या चर्चेत ठरल्यानुसार एमआयएमने आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीत पाठिंबा जाहीर केला. एवढेच नाही तर ‘एमआयएम’ (AIMIM) सोबतची आघाडी वंचितने तोडल्यानंतरही प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला.

यातून संभाजीनगर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांची सहानुभूती मिळवण्याचा इम्तियाज यांचा प्रयत्न होता. तो कितपत यशस्वी होतो, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. एमआयएमने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी यावर त्यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

याचाच अर्थ न मागता दिलेल्या पाठिंब्याची वंचितने दखलच घेतली नाही, असे दिसते. बडेभाई एमआयएमवर नाराज असले, तरी छोटे भाई आनंदराज आंबेडकर मात्र इम्तियाज जलील यांच्या सोबत असल्याचे चित्र आहे.

Imtiaz Jalil, Anandraj Ambedkar
Sunetra Pawar News : सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; 'या' घोटाळ्याप्रकरणी 'क्लीन चीट'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com