Eknath Khadse News: एकनाथ खडसेंची भाजप घरवापसी कधी? विनोद तावडे म्हणाले,...

Jalgaon BJP Politics: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनीही खडसे हे भारतीय जनता पक्षात जात असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार हे निश्चित झाले होते.
Eknath Khadse News
Eknath Khadse News Sarkarnama

Jalgaon Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा पंधरा दिवसापासून सुरु आहे, पण तारीख ठरलेली नाही. स्थानिक राजकारणामुळे खडसेंचा प्रवेश रखडल्याचे बोलले जाते. खडसेंच्या घरवापसीची तारीख ठरली नसली, तरी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विनोद तावडे यांनी दिल्लीत खडसेंच्या प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

खडसे यांची घरवापसी लवकरच होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.एकनाथ खडसे यांनी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली होती. दिल्लीतील नेत्यांनी आपल्या भाजप प्रवेशाला सहमती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनीही खडसे हे भारतीय जनता पक्षात जात असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार हे निश्चित झाले होते. मात्र त्यांचा प्रवेश केव्हा होणार या बाबत सस्पेन्स होता.दिल्लीतील नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असे सांगितले जात होते.

Eknath Khadse News
MLA Nilesh Lanke News: नीलेश लंके कर्जबाजारी, कुटुंबाकडे ३५ लाखांची मालमत्ता

जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात भाजप (BJP) उमेदवारांचा अर्ज भरताना दिल्लीतील नेता उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्या वेळी त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होइल असे सांगण्यात आले होते.

आज दिली येथे पक्षाचे केंद्रीय निरीक्षक विनोद तावडे यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांची घरवापसी लवकरच होईल, असे सांगितले, तसेच महाराष्ट्रातील प्रचारात जो आरोपांचा स्तर घसरला आहे त्या बाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com