Ajit Pawar News : 'दादांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही,' राज ठाकरेंचं विधान अन् अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar In Beed : "ही भावकी आणि गावकीची निवडणूक नाही. त्यामुळे भावनिक होऊन मतदान करून नका," असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
raj thackeray ajit pawar
raj thackeray ajit pawarsarkarnama

Beed News, 11 May : बारामतीत लोकसभा मतदारसंघातील ( Baramati Lok Sabha Constituency ) हायव्होल्टेज निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्य मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. मावळ, शिरूर, नगर, बीड मतदारसंघात सभांचा धडाका सुरू असून नेत्यांना दिलेल्या दमबाजीवरून अजितदादा पुन्हा चर्चेत आले आहेत. यात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्यासाठी परळीत सभा घेतला. यासभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पुण्यात केलेल्या विधानाचा संदर्भ अजित पवार यांनी भाषण केलं.

राज ठाकरे काय म्हणालेले?

"माझे अजित पवारांबरोबर ( Ajit Pawar ) अनेक मतभेद असतील. पण, अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. आजपर्यंत मी त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मात्र, शरद पवारांसोबत ( Sharad Pawar ) राहून देखील त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही," असं राज ठाकरेंनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर बीडमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, "राज ठाकरे आणि माझी भूमिका वेगळी आहे. आम्ही दोघे आपापले पक्ष चालवतो. राज ठाकरेंनी म्हटलं, 'मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही.' ती माझी भूमिका आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची भूमिका घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यासाठी अनेक आमदार, मंत्री, कार्यकर्ते, पक्षांचे अध्यक्ष आम्हाला साथ देत असतात."

"शेतकरी ही आपली जात आहे. दुसरी कुठलीही आपली जात नाही. बाकीचे जण राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी 96 कुळी असल्याचं सांगतात. मग, आम्ही काय 92 कुळी वाटतो काय? उगीच काहीतरी गप्पा हाणायच्या... आम्हालाही बोलता येत. पण, आम्ही तारतम्य ठेऊन बोलत असतो. कारण, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आम्हाला शिकवण असून महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.

raj thackeray ajit pawar
Ajit Pawar News : "हा पठ्ठ्या खासदारकीला पडला, मुलीला ग्रामपंचायतीत निवडून आणता आलं नाही, पैशांची मस्ती आलीय"

"ही लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. ही भावकी आणि गावकीची निवडणूक नाही. त्यामुळे भावनिक होऊन मतदान करून नका. आपल्याला बीडच्या मागासलेपणाचा शिक्का मिटवून टाकायचा आहे," असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

raj thackeray ajit pawar
Ajit Pawar : अजितदादांचा दोन दिवसांत दोन नेत्यांना दम; ऐन पावसात महाराष्ट्राचं राजकारण तापलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com