Beed Lok Sabha Election 2024 : सोळंके, मुंडे, मुंदडा, लक्ष्मण पवारांच्या मतदारसंघातून सोनवणे अन् पंकजाताईंना किती मते?

Bajrang Sonwane : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे सर्वच मतदारसंघातून पिछाडीवर होते. तेव्हा, प्रितम मुंडेंना परळीपेक्षा आष्टी विधानसभा मतदारसंघातून लीड मिळालं होतं.
bajrang sonwane | pankaja munde
bajrang sonwane | pankaja mundesarkaranama

Beed News, 5 June : भाजपच्या ( bjp ) पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात अगदी अटीतटीच्या झालेल्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी सहा हजार 585 मतांनी विजय मिळविला. पंकजा मुंडेंना त्यांचे होमपिच परळी मतदारसंघातून बंपर लीड मिळाली. तर, बजरंग सोनवणे यांना बीड विधानसभा मतदारसंघाने तारले.

मागच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे ( bajrang Sonwane ) सर्वच मतदारसंघातून पिछाडीवर होते. त्यावेळी भाजपच्या प्रितम मुंडेंना त्यांच्या परळीपेक्षा आष्टी विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली होती. यावेळी पंकजा मुंडेंना त्यांचे होमपिच परळी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य भेटले.

या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना केवळ 66940 मते मिळाली. तर, पंकजा मुंडेंना 141774 मते मिळाली. येथून मुंडेंनी 74834 मतांची आघाडी घेतली. तर, बीड मतदारसंघात बजरंग सोनवणेंना सर्वाधिक 62312 मतांचे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात पंकजा मुंडेंना 77605 मते मिळाली. तर, बजरंग सोनवणे यांनी 139917 मते घेतली.

बजरंग सोनवणेंना त्यांचे होमपिच असलेल्या केजमध्ये देखील लिड मिळाली. मात्र, तुलनेने मताधिक्याचे प्रमाण कमी होते. या ठिकाणी सोनवणेंना 123158 मते मिळाली. तर, मुंडेंना 109360 मते मिळाली. केजमधून सोनवणे 13698 मतांनी आघाडीवर राहीले.

bajrang sonwane | pankaja munde
Bajrang Sonwane Winning Factor : बजरंग सोनवणेंच्या विजयाच्या आकड्यांचा नेमका खेळ काय? कुणाला किती मते...

गेवराईतून बजरंग सोनवणेंना 39096 मतांची आघाडी राहीली. येथून सोनवणेंना 134505 मते मिळाली तर मुंडेंना 95409 मते मिळाली. माजलगाव मतदारसंघात पंकजा मुंडेंना अल्पसे मतदान मिळाले. येथे मुंडेंना 105648 मते मिळाली तर सोनवणेंना 104713 मते मिळाली. येथून मुंडेंना 935 मतांची आघाडी मिळाली. आष्टी मतदारसंघातून मुंडेंना 32254 मतांची आघाडी मिळाली. मुंडेंना 14553 मते मिळाली. तर, सोनवणेंना 113299 मते मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com