Parbhani Loksabha Constituency : परभणीच्या लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस वाढली...

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar : महायुतीच्या उमेदवाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, प्रस्थापित विरोधी मतप्रवाह, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा यांची मदत होणार आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही तास बाकी असतानाही महायुतीत आणि महाविकास आघाडीत काही जागांबाबत तेढ आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीचे उमेदवार कोण असणार, याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही.

येथे आघाडीकडून विद्यमान खासदार संजय जाधवांची (Sanjay Jadhav) उमेदवारी निश्चित मानली जातेय, तर महायुतीच्या जागावाटपात परभणी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे असेल, अशी माहिती आहे. त्यांच्याकडून राजेश विटेकर यांचे नाव निश्चित आहे. खासदार संजय जाधवांनी पंढरपूरच्या विठ्ठलचरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकांचेही सत्र सुरू केले असून, येथे आघाडीचा मेळावाही पार पडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Shirur Lok Sabha Constituency : शिरूरमध्ये वादळापूर्वीची शांतता! महायुतीत लोकसभेची जागा कुणाकडे, उमेदवार कोण?

भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी

परभणी (Parbhani) लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली होती. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जिल्ह्यामध्ये आयोजित विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची आढावा बैठकाही घेतल्या. गाव चलो अभियानातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला. एकूणच पक्षाने मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी केली होती. मात्र, महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याच्या माहितीमुळे भाजपच्या गोटात निराशा पसरली आहे. यातूनच परभणी येथे आयोजित बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष व अनेक पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे बोलले जात आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
PMC Commissioner News: पुणे महापालिकेत 'दादा'गिरी; विक्रम कुमार गेले अन् राजेंद्र भोसले आले

राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना मतभेद

महायुतीच्या या बैठकीकडे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी व शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्यात मतभेदाची पार्श्वभूमी आहे. सईद खान हे यांच्या खास मर्जीतले मानले जातात. त्यांनी जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. महायुतीच्या उमेदवाराला मुस्लिम मतांची आवश्यकता असताना सईद खान यांना डावलण्यात आल्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो.

महायुतीच्या उमेदवाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता, प्रस्थापित विरोधी मतप्रवाह, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा यांची मदत होणार आहे. मात्र, आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजात असलेल्या रोषाचा सामनाही महायुतीच्या उमेदवाराला करावा लागणार आहे. त्यातच पुन्हा महायुतीच्या नेत्यांमधील मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचे आव्हान महायुतीच्या उमेदवारासमोर असणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
मोठी बातमी ! बैठका, दिल्ली वारी, दावे-प्रतिदाव्यांनंतर महायुतीचं जागावाटप फायनल? असा असणार फॉर्म्युला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com