Shirur Lok Sabha Constituency : शिरूरमध्ये वादळापूर्वीची शांतता! महायुतीत लोकसभेची जागा कुणाकडे, उमेदवार कोण?

Devendra Fadnavis, Ajit Pawar : महाविकास आघाडीकडून बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव फिक्स झाले आहे, तर शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : महाविकास आघाडीकडून बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव फिक्स झाले आहे, तर शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या दोन्ही मतदारसंघांत मात्र महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट निवडणूक लढवणार, याबाबत अद्यापही निर्णय होताना दिसत नाही. परिणामी या दोन्ही मतदारसंघांत महायुतीत कमालीची शांतता पसरली आहे. दरम्यान, बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत आहे. मात्र, शिरूरमधील शांततेमुळे महायुतीत अशांततेचे वातावरण पसरले आहे. Shirur Lok Sabha Constituency

पुणे लोकसभेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर बारामतीमध्ये अद्याप महायुतीने उमेदवार जाहीर केला नसला तरी येथून उपमुख्यमंत्री पवार जाहीर सभा घेत आहेत. ते लोकसभेला माझ्या विचारांच्या उमेदवाराला साथ द्या, असे भावनिक आवाहन बारामतीकरांना करत आहेत. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे शिरूरमधून खासदार कोल्हेंच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Electoral Bond Scam : 'चंदा दो, धंदा लो; इलेक्टोरल बाँड भारतातील सर्वात मोठा स्कॅम!'

शिरूर लोकसभामधून सुरुवातीच्या काळात सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर माजी खासदार आणि म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. मात्र, अजितदादांच्या गोटातूनच कडवा विरोध होऊ लागल्याने आढळराव पाटलांचे नाव मागे पडले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रदीप कंद यांचे नावही घेतले जात होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात शांतता पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Winner Margin : .... आश्चर्यच आहे ! इतक्या कमी मतांनी भोलानाथ जिंकले

पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभेची जागा भाजपच्या, तर बारामती, शिरूर अजित पवारांना (Ajit Pawar) आणि मावळची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाट्याला आलेली आहे. शिरूरमध्ये खासदार कोल्हे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, 'अब की बार 400 पार ' अशी घोषणा देत भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षाने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिरूर मतदारसंघात महायुतीने पूर्ण ताकद लावली तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या विरोधात चांगली लढत देता येऊ शकते. मात्र, त्यासाठी तेवढाच तोडीचा उमेदवार महायुतीला द्यावा लागणार आहे. हा उमेदवार निश्चित करताना महायुती कोणते धक्कातंत्र वापरणार अशी चर्चा आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून शनिवारी आगामी लोकसभेची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांतच महायुती शिरूरमध्ये आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यात असून, तो कोण असेल याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 News: महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या सहा जागांचे उमेदवार ठरले, आग्रह मात्र नऊ जागांसाठी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com