Jalna Loksabha Election 2024 : कल्याण काळेंना खासदार झाल्यासारखं वाटतंय...

Raosaheb Danve Vs Kalyan Kale : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जुने अस्त्र बाहेर काढत काळे यांनाच मैदानात उतरवले होते.
Kalyan Kale
Kalyan Kale sarkarnama

Jalna News, 25 May : लोकसभेच्या जालना मतदारसंघातील ( Jalna Lok Sabha Constituency ) महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) उमेदवार माजी आमदार कल्याण काळे यांनी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना तगडी फाईट दिली. 2009 मध्ये झालेल्या जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून लढलेल्या काळे यांनी रावसाहेब दानवे यांना चांगली झुंज देत जेरीस आणले होते. तेव्हा त्यांचा अवघ्या आठ हजार मतांनी पराभव झाला होता.

त्यामुळे महाविकास आघाडीने सलग सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांच्या विरोधात जुने अस्त्र बाहेर काढत काळे यांनाच मैदानात उतरवले होते. 13 मे रोजी मतदान झाल्यापासून काळे यांचा कॉन्फिडन्स, असा काही वाढला आहे की मतमोजणी होण्याआधीच त्यांना खासदार झाल्यासारखं वाटतंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यावरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात असलेले वातावरण याचा आपल्याला फायदा होईल आणि आपण निवडून येणार, असा दावा कल्याण काळे ( Kalyan Kale ) व त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कल्याण काळे यांनी संपूर्ण जिल्ह्यात आभार दौरा सुरू केला.

या दौऱ्याच्या माध्यमातून ते महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या या आभार दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त असल्यामुळे काळे यांना विजयाची खात्री वाटू लागली आहे. अपक्ष उमेदवार मंगेश साबळे ( Mangesh Sabale ) यांनी जास्त मतांचे विभाजन केले नाही, तर यंदा विजयाचा गुलाल आपल्याच कपाळी लागणार, असा दांडगा आत्मविश्वास काळे आणि त्यांचे समर्थक बाळगून आहेत.

4 जून रोजी प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यानंतर मतदारांनी कोणाला दिल्लीत पाठवायचा निर्णय घेतला आहे हे स्पष्ट होईल. परंतु, काळे यांच्या उतावीळपणामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीकाही होत आहे. दुसरीकडे विजयाचा षटकार मारण्याच्या तयारीत असलेली रावसाहेब दानवे मात्र 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत.

Kalyan Kale
Chandrakant Khaire News : शांतीगिरी महाराजांचा पराभव केला अन् खैरेंना मिळाले नवे नाव...

मतमोजणी आधी कुठलाही दावा करताना ते दिसत नाहीत. सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांकडून मात्र पुन्हा रावसाहेब दानवे हेच खासदार होणार, असा दावा करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. एकीकडे कल्याण काळे यांचा आभार दौरा आणि त्यातून खासदार झाल्याचा आणला जात असलेला आव, तर दुसरीकडे शांतपणे चार जूनच्या निकालाची वाट पाहणारे रावसाहेब दानवे यांच्याबद्दल चर्चा होताना दिसते आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Kalyan Kale
Dharashiv Kailas Patil News : फक्त.. पंचनामा व घोषणा नको, शेतकऱ्यांना पेरणीआधी मदत द्या!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com