Congress News : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच वाढवले निलंगेकरांचे टेन्शन; लोकसभेचे आव्हान कसे पेलणार?

Ashok Patil Nilangekar : निलंगेकरांसमोर ज्येष्ठांची उघडपणे नाराजी...
Ashok Patil Nilangekar
Ashok Patil NilangekarSarkarnama
Published on
Updated on

Latur News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील-निलंगेकर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला. पण या मेळाव्यात ज्येष्ठांनी नव्या पदाधिकारी, नेत्यांचे कान टोचल्याने निलंगेकरांना चांगलेच टेन्शन आले. तीन-तीन पिढ्यांपासून आम्ही पक्षात काम करतो, पण आम्हाला कोणीच विचारत नाही, अशी जाहीर नाराजी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) तोंडावर पक्षातील ही नाराजी परवडणारी नाही, हे लक्षात घेऊन अशोक पाटील-निलंगेकर (Ashok Patil-Nilangekar) यांनी नव्या आणि जुन्यांची एकत्रित मोट बांधत लातूरमधून काँग्रेसचा (Congress) खासदार निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला. आधीच लातूरमध्ये काँग्रेस लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी लढत नाही, असा आरोप केला जातो. त्यातच निलंगेकरांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ज्येष्ठांनी मनात असलेली खंत बोलून दाखवली.

Ashok Patil Nilangekar
Abhijeet Patil News : एक म्हणतो, ‘बिल काढायचं असेल तर पक्षात प्रवेश करा; दुसऱ्याने पक्षाची सत्ताच घालवली...’

'आम्ही पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्या आहेत. प्रचारात कधी घर दार, नाही पाहिलं केवळ पक्ष म्हणून आम्ही निलंगेकरसाहेबांसोबत होतो. या जिल्ह्यावर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil-Nilangekar), विलासराव देशमुख, माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी एकसंध जिल्हा ठेवत काँग्रेस पक्ष मजबूत ठेवला होता. आता मात्र वेगळीच परिस्थिती झाली आहे. प्रत्येकाला नेता व्हावे वाटते, हा त्या गटाचा कार्यकर्ता, तो त्यांचा चाहता, अशी खिल्ली उडवली जाते हे कुठतरी थांबले पाहिजे, असा घरचा आहेर ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिला आणि मेळाव्यातील वातावरणच बदलले.

सध्या निलंगा मतदारसंघातील काँग्रेस नेत्यासह कार्यकर्त्यांत मरगळ आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा अशोक पाटील-निलंगेकर यांचा प्रयत्न होता. नुकताच भाजप महायुतीचा मेळावा लातूर येथे पार पडला, तर मराठवाडास्तरावरील महाविकास आघाडीचा मेळावाही लवकरच लातूर येथे होणार आहे. तत्पूर्वी निलंगा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा निलंगेकरांनी घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही तिसऱ्या पिढीपासून काँग्रेस पक्षाचे काम करतो, आजची परिस्थिती काही विचारूच नका, नवीन कार्यकर्ते पक्षात आले त्यांना जरूर घ्या, पण आमचाही मान ठेवायला सांग, असे खडे बोल काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सुनावले. तालुकापातळीवर काँग्रेस पक्षात गटबाजी आहे, एका गटाचा नेता दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याला विचारात घेत नाही, हे थांबले पाहिजे, असा सल्लाही अनेकांनी दिला.

यावर जुन्या निष्ठावंतांना सोबत घेत नव्या तरुण कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा काँग्रेसला वैभवाचे दिवस दाखवू. मागील लोकसभा निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघातून 55 हजार मतांनी काँग्रेसचा उमेदवार 'मायनस' होता. तो गॅप भरून काढत येत्या काळात पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देईल, त्याचे प्रामाणिक काम करून निवडून आणू, असा विश्वास निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. कोणताही गट पक्षात नको, ज्येष्ठ नेत्यांच्या विकासकामाचा वारसा घेऊन सर्व जण समन्वयाने काम करू, असेही निलंगेकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीला आजपासूनच कामाला लागा, आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते, असे आवाहनही निलंगेकर यांनी केले.

(Edited By - Rajanand More)

R...

Ashok Patil Nilangekar
Jitendra Awhad : मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांना प्रभू श्रीरामाची भुरळ; व्हिडीओ ट्विट करत लिहिले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com