- पंकज रोडेकर
Jitendra Awhad : प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनाही प्रभू श्रीरामांची भुरळ पडल्याचे पाहण्यास मिळते आहे. त्यांनी प्रभू श्रीरामांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये 'आपले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम' असे लिहिले आहे.
याशिवाय त्या व्हिडीओला रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, असे तालबद्ध संगीतसुद्धा दिले आहे. त्याचबरोबर 22 जानेवारीला त्यांच्या मतदारसंघात असलेल्या कळव्यातही त्यांच्या पक्षातील माजी नगरसेवकाने महाआरतीचे आयोजनही केले आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
दरम्यान, शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशेष अधिवेशनात प्रवक्ते म्हणून बोलताना, आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. एवढेच नाही, तर त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आगामी लोकसभेची तयारी, तसेच मतांची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यातच 22 जानेवारीला विविध कार्यक्रम होणार असून साहजिकच सर्वच नागरिक त्यामध्ये न सांगता सहभागी होत आहेत. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासह उबाठाचे खासदार राजन विचारे यांनी उडी घेतली आहे. अशाप्रकारे मागे राहणाऱ्यांना रामनामाची भुरळ पडली आहे का ? किंवा मतपेरणीसाठी हा खटाटोप आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
ठाकरे गटाकडूनही ठाण्यात रामलल्लाची रथयात्रा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी प्रभू श्रीरामांचा रामरथ मिरवणूक, पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचा प्रारंभ वारकरी भवन, राम मारुती रोड, नौपाडा येथून होणार आहे. ही दिंडी श्री गजानन महाराज मंदिर येथून तिची सांगता जांभळी नाका येथे होणार आहे. ठाण्यातील कीर्तन वारकरी भवन येथे राम उत्सव, अभिषेक, भजन असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.