Lok Sabha Election 2024 : 'साठ वर्ष भ्रमनिरास म्हणून लोकांची मोदींना साथ'; भाजप प्रवेशानंतर अर्चना पाटील चाकूरकरांना साक्षात्कार...

Archana Patil News : देशात सलग काही वर्ष सत्तेत असणार्‍या नेत्यांकडून व पक्षाकडून भ्रमनिरास झाल्यामुळे दहा वर्षांपूर्वी जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता सोपवली.
Sarkarnama
SarkarnamaSarkarnama
Published on
Updated on

Latur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून विविध विकास योजना राबविल्या आहेत. या योजनांचे लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले असून मागील दहा वर्षात देशातील सामान्य जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळेच देशातील सामान्य माणूस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे असून या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजपाचीच सत्ता येईल, असा विश्‍वास डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

अर्चना पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारात त्या सक्रीय सहभाग घेत आहेत. सासरे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेसमध्ये असले तरी अर्चान पाटील मात्र आपल्या भाषणातून या पक्षावर जोरदार हल्ला चढवत आहेत. सामान्य नागरिकांना सत्तेबाबत आकर्षण असण्याचे कारण नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या हिताचे निर्णय जो नेता किंवा पक्ष घेतो, त्याच्या पाठीशी मतदार उभा असतो. त्याच व्यक्तीला मतदान करून सत्तेसाठी कौल देतो. देशात सलग काही वर्ष सत्तेत असणार्‍या नेत्यांकडून व पक्षाकडून भ्रमनिरास झाल्यामुळे दहा वर्षांपूर्वी जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता सोपवली. जनतेचा हा विश्‍वास सार्थ ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास योजनांची आखणी केल्याचे पाटील म्हणाल्या.

Sarkarnama
Sushma Andhare News : हे वागणे बरे नव्हे; असे सुषमा अंधारे भाजपला का म्हणाल्या ?

दहा वर्षापूर्वीपर्यंत दिल्लीच्या सरकारचे काम नेमके काय असते हे नागरिकांना माहितही नव्हते. हे सरकार जनतेसाठी काय काय करू शकते हे पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिले. सामान्य नागरिकाला निवार्‍यासह शौचालय, गॅस, अन्नधान्य पुरवठा, आरोग्यासाठी विविध सवलतीच्या योजना, दळण-वळणासाठी चांगले रस्ते, गतिमान प्रवासासाठी रेल्वे व विमानाची सुविधा, शहर व गावांची स्वच्छता अशा कितीतरी योजना केंद्र सरकारने राबविल्या.

विविध योजनांचे लाभ थेट नागरिकांना मिळावेत, अशा योजना सुरू झाल्या. अनुदानाची रक्कम नागरिकांच्या खात्यात जमा होऊ लागली. परिणामी जनतेने मोदी यांना आपला नेता म्हणून मनातून स्वीकारले आहे. सामान्य जनतेच्या मनात मोदी (Narendra Modi) यांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा कोणीही बदलू शकत नाही. हा व्यक्ती देश बदलू शकतो, ही जनतेची धारणा असून ती खरीच आहे.

Sarkarnama
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा मोदी यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केलेला आहे. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत लातूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मोठे मताधिक्य मिळणार आहे. देशात मोदी यांनी म्हटल्याप्रमाणेच चारशेहून अधिक जागा निवडून येतील आणि पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, असा दावाही अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com