Sushma Andhare News : हे वागणे बरे नव्हे; असे सुषमा अंधारे भाजपला का म्हणाल्या ?

Poitical News : भाजप स्वायत्त संस्थेचा गैरवापर करते हे मी वेगळे सांगायची गरज नाही. बारामती येथे सुप्रिया सुळे यांना आणि अपक्ष उमेदवारांना या दोघांना तुतारी चिन्ह मिळते हा काय प्रकार सुरू आहे, हे समजत नसल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

KolhaPur News : नागपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये तडस कुटुंबीयावर आरोप केले होते. त्याबद्दल मला निवडणूक आयोगाकडून दिलेल्या नोटिसीला कायदेशीर उत्तर आज पाठवत आहे. आम्ही ट्विट करून ठाण्यातील मीनाक्षी शिंदे यांचा व्हिडिओ दाखवला, तर त्यात कारवाई का होत नाही, असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.

निवडणूक आयोग, बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष यांनी विचार करावा. 'उलटा चोर कोतवाल को' ...अशा पद्धतीने वागणे बरे नव्हे. नोटीस ही राजकीय हेतूने पाठवली आहे. किती तरी लोकांना ही नोटीस पाठवली आहे. एवढ्या लोकांच्याकडे नोटिसा पाठवून दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

भाजप (Bjp) स्वायत्त संस्थेचा गैरवापर करते हे मी वेगळे सांगायची गरज नाही. बारामती येथे सुप्रिया सुळे (Supriya sule) यांना आणि अपक्ष उमेदवारांना या दोघांना तुतारी चिन्ह मिळते हा काय प्रकार सुरू आहे, हे समजत नसल्याचा आरोपही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

Sushma Andhare
Uddhav Thackeray Manifesto: ...अखेर ठाकरेंचा 'वचननामा' आला! शेतकऱ्यांसाठी 'ही' मोठी घोषणा

ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. महाविकास आघाडीला प्रतिसाद वाढत आहे. या निवडणुकीत आम्ही 30 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहोत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सरकारने चिंतन करण्याची गरज आहे. Evm मशिनवरदेखील शंका उपस्थित होतेय, निवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर होतोय. सत्ताधाऱ्यावर कारवाई होत नाही. जितकं जास्त गैरवापर तेवढं जास्त बूमरँग होत आहे.

मोदींना लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर येत्या काळात महागाई.. महिलांचे प्रश्न... सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फायली लपवत असतील तर तेही गुन्हेगार आहेत. निवडणुकीच्या काळात असं बोलणं हा आचारसंहिता भंग आहे, असा आरोप अंधारे यांनी केला.

महाडिक यांच्या सरकारवर तक्रारी कारवाई होत नसतात. हे मागच्या वेळी माझ्यासोबत होते आणि मी त्यांच्या प्रचारासाठी जात होते. महाडिक यांच्याबद्दल अनेक गोष्टी माहीत आहेत. ते आता बोलणार नाहीत ते सभेत बोलेन, असेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोक चिडत आहेत ते मतपेटीतून दिसेल

अजित पवार यांनी कचा कचा बटन दाबून कचा कचा निधी घ्या म्हटले आहे, हे सरळ सरळ आमिष आहे. तरीही तेथे कोणीही काही बोलत नाही म्हणजे हा यंत्रणाचा गैरवापर आहे. जितका हे यंत्रणाचा गैरवापर करतात इतके लोक चिडत आहेत ते मतपेटीमधून दिसून येईल, असेही अंधारे म्हणाल्या.

गुन्हा लपवणे हादेखील गुन्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मी प्रचंड सहानुभूती व्यक्त करते. ज्या लोकांना तिकीट मिळाले आहेत ते निवडून येणार नाहीत, असे सर्वे सांगत आहे. त्यामुळे ते हवालदार झाले आहेत. यामुळे ठाकरे कुटुंबांवर तोंड सोडून बोलत आहेत. आता ते आवरते घेत आहेत. एवढ्या फायली त्यांच्याजवळ असतील तर ते गप्प का बसत आहेत ? गुन्हा लपवणे हादेखील गुन्हा आहे. एकनाथ शिंदे गुन्हा लपवत आहेत, तर तेदेखील गुन्हा करत आहेत, असा आरोप अंधारे यांनी केला आहे.

(Edited By : Sachin Waghmare )

R

Sushma Andhare
Sushma Andhare : 'नापास झालेल्या गृहमंत्र्यांबद्दल नव्याने काय शंख करायचा?' ; सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com