narendra modi
narendra modisarkarnama

Narendra Modi In Nanded : राहुल गांधींवर हल्ला, 'इंडिया' आघाडीचा समाचार अन् अशोक चव्हाणांचं कौतुक; मोदी काय म्हणाले?

Narendra Modi News : मतदानाचा टक्का घसरल्याने मोदींना चिंता, हे योग्य नसल्याचे व्यक्त केले मत..

Nanded News : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) महाराष्ट्रासह देशात पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानातील निरुत्साह आणि घसरलेला टक्का याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या नांदेड येथील भाषणातून दिसून आली. नांदेड मतदारसंघाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर ( Pratap Patil Chikhalikar ), हिंगोलीचे बाबूराव कदम-कोहळीकर ( Baburao Kadam Kohlikar ) यांच्यासाठी मोदींनी शनिवारी ( 20 एप्रिल ) संयुक्त सभा घेतली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानाबद्दल नाराजी व्यक्त केली.

"उन्हाची तीव्रता वाढली आहे, शेतकरी कामात आहेत, विवाह सोहळे होताहेत हे जरी खरे असले तरी देशासाठी सीमेवर ज्या पद्धतीने जवान कशाचीही तमा न बाळगता तैनात असतो तसंच देशाच्या लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. "26 एप्रिलची तयारी झाली का?" अशी विचारणा उपस्थितांना करतानाच पहिल्या टप्प्यात 'एनडीएला'च भरभरून मतदान केल्याचा दावा मोदी ( Narendra Modi ) यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"देशाचे भविष्य ठरवण्यासाठी मतदान करत आहात"

"तुम्ही 'एनडीए'च्या बाजूने एकतर्फा मतदान करून आपला विजय निश्चित करत आहात, त्याबद्दल आभार. पण, जे लोक मतदान करत नाहीत, ते योग्य नाही. मतदान करताना उदासीनता दाखवू नका, मतदान आपला अधिकार आहे. मतदान हा कोणावर उपकार नाही, तर देशाचे भविष्य ठरवण्यासाठी तुम्ही मतदान करत आहात, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. लोकशाहीसाठी सगळ्यांनी मतदान करायलाच हवे," असे आवाहन करताना मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

"पुढील पंचवीस वर्षे जगात भारताचे महत्त्व वाढवणारे"

"विरोधकांनी निराश होऊ नये, आज नाही तर उद्या, कधी ना कधी तुम्हाला संधी मिळेलच. हिंमत हारू नका. भारताच्या मतदानाचा जगावर प्रभाव होतो. पुढील पंचवीस वर्षे जगात आपले महत्त्व वाढवणारे आहेत," असा दावा करताना मोदींनी 'इंडिया' आघाडीला लोकांनी नाकारल्याचे म्हटले. "आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी 'इंडिया' आघाडीचे नेते काम करत आहेत. देश कोणाच्या हातात सोपवायचा हेच ते ठरवू शकलेले नाहीत," असंही मोदींनी म्हटलं.

"काँग्रेसचे 'शहजादे' वायनाडमध्ये संकटात"

"लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. त्यांच्यात लढण्याची हिंमत नाही, त्यांना उमेदवार मिळत नाही. काँग्रसचे नेते प्रचार करत नाहीत, देशातील 25 टक्के लोकसभेच्या जागा अशा आहेत, जिथे 'इंडिया' आघाडीचे नेते आपापसांत लढत आहेत. काँग्रेसचे 'शहजादे' वायनाडमध्ये संकटात आहेत, ते आणखी दुसऱ्या ठिकाणाहून लढू शकतात," अशी टीका मोदी यांनी राहुल गांधींवर केली.

"काँग्रेसला देशाच्या जनतेवरच विश्वास नाही"

सोनिया गांधींना जिंकण्याची खात्री नाही म्हणून मागच्या दाराने त्या राज्यसभेवर गेल्याचा टोलाही मोदी यांनी या वेळी लगावला. "4 जून नंतर इंडिया आघाडी शतप्रतिशत एकमेकांचे कपडे फाडून, केस ओढतील. त्यांच्यावर मत वाया घालवू नका. आम्ही गरिबांसाठी काम केले तर त्याची थट्टा काँग्रेसकडून केली जाते. आम्ही गरिबांना शौचालय दिले, 50 कोटी बँक खाती उघडली यावरही त्यांनी टीका केली. काँग्रेसला देशाच्या जनतेवरच विश्वास नाही, अशा पक्षावर तुम्ही विश्वास ठेवणार का?" असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

narendra modi
PM Narendra Modi News : मोहम्मद शमीच्या बॉलिंगची आठवण अन् मोदींची जोरदार ‘बॅटिंग’

"अशोकजी हमारे साथ आ गये ये खुशी की बात है"

काँग्रेसमुळे या भागाचा विकास रखडला, तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागत आहे, असा आरोप मोदींनी केला. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याचा उल्लेख मोदींनी आवर्जून केला. 'अशोकजी हमारे साथ आ गये ये खुशी की बात है,' असे सांगतानाच दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यामुळे आपण सत्यसाई बाबांना भेटलो. शंकरराव चव्हाणांकडून आपल्याला खूप काही शिकायलं मिळाले, आज ते कुटुंब आमच्यासोबत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

"आमचा वेळ काँग्रेसचे खड्डे भरण्यात गेला"

राज्यातलं सरकार चांगलं काम करत आहे, असे म्हणत मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे कौतुक केले. "काँग्रेसने देशातील जनतेला दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार करण्याची मोदी गॅरंटी आहे. दहा वर्षांत राज्यात झालेलं काम हा ट्रेलर आहे. आमचा वेळ काँग्रेसचे खड्डे भरण्यात गेला. पुढील पाच वर्षांत राज्य आणि मराठवाड्याला खूप पुढे न्यायचे आहे," असे आश्वासन मोदींनी दिले.

"शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ सन्मानाने, सुरक्षित देशात आणला"

"'सीएए'सारखा कायदा आणला याचाही काँग्रेस विरोध करत आहे. अफगाणिस्तानमधून आम्ही शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ सन्मानाने, सुरक्षित देशात आणला. 'सीएए' कायद्यानूसार तेथील शीख बांधवांना देशात सामावून घेता येणार आहे. पण 'सीएए'ला विरोध करत काँग्रेस शीख समाजावर अजूनही 1984 चा सूड उगवत आहे का?" असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला.

"'इंडिया' आघाडीचे लोक सनातन धर्माला शिव्या देतात"

"कलम 370, तीन तलाक इतिहास जमा झाले आहेत. राम मंदिर उभे राहिले, पण 'इंडिया' आघाडीचे लोक सनातन धर्माला शिव्या देत आहेत, राम मंदिर, आमच्या भावनांचा अपमान करत आहेत. अशा लोकांना माफ करता येणार नाही," असे म्हणत मतदानाचे यापूर्वीचे रेकॉर्ड तोडा, आपल्याला प्रत्येक पोलिंग बूथ जिंकायचे आहे, त्यासाठी प्रत्येक घरात जाऊन माझा नमस्कार पोहाेचवा," असे आवाहन शेवटी मोदींनी उपस्थितांना केले.

( Edited By : Akshay Sabale )

R

narendra modi
PM Narendra Modi News : मोदींनी दहा वर्षांत किती सुट्ट्या घेतल्या? RTI मधून आले समोर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com