PM Narendra Modi News : मोहम्मद शमीच्या बॉलिंगची आठवण अन् मोदींची जोरदार ‘बॅटिंग’

Lok Sabha Election 2024 : देशात आज 102 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. सर्वाधिक 39 जागा तमिळनाडू राज्यात आहे. दक्षिण भारतात कामगिरी सुधारण्यासाठी भाजपकडून जिवाचे रान केले जात आहे.  
Mohammed Shami, PM Narendra Modi
Mohammed Shami, PM Narendra ModiSarkarnama

Uttar Pradesh News : एकीकडे लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi News) प्रचाराचा धडाकाही सुरूच आहे. आज ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून, अमरोहा येथे त्यांची प्रचार सभा झाली. या वेळी मोदींकडून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना योगी सरकारच्या कामगिरीचेही कौतुक केले. तसेच त्यांना क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या बॉलिंगचीही आठवण झाली.

मागील वर्षी झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय (India) टीमला अंतिम सामन्यापर्यंत पोहाेचवण्यात मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) वाटा मोलाचा होता. मात्र, अंतिम सामन्यात टीमला पराभव पत्करावा लागला. पण शमीच्या कामगिरीची आठवण क्रिकेटप्रेमींना असल्याचे आजच्या मोदींच्या प्रचार सभेत दिसून आले.

Mohammed Shami, PM Narendra Modi
Lok Sabha Election News : पहिल्या टप्प्यातील 102 मतदारसंघांत 2019 मध्ये कुणाचा होता दबदबा?

शमीच्या कामगिरीची आठवण काढताना मोदी म्हणाले, अमरोहामध्ये केवळ ढोलच नाही तर देशाचा डंकाही वाजवतो. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भाई मोहम्मद शमीने जी कमाल केली, ती संपूर्ण जगाने पाहिली. खेळातील चांगल्या कामगिरीमुळे केंद्र सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. योगी सरकारही येथील युवा खेळाडूंसाठी स्टेडियम उभारत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशाच्या भविष्याची ही निवडणूक (Election) असल्याचे सांगत मोदी म्हणाले, या निवडणुकीत तुमचे एक-एक मत भारताचे भवितव्य ठरवणार आहे. प्रत्येक गाव, गरिबांसाठी एक व्हिजन घेऊन भाजप पुढे जात आहे. पण इंडिया आघाडीतील लोकांची संपूर्ण शक्ती गाव, गरिबांना आणखी मागे नेण्यासाठी वापरली जात आहे. या मानसिकतेमुळे सर्वाधिक नुकसान अमरोहासह पश्चिम उत्तर प्रदेशात झाले.

दरम्यान, देशात आज 102 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात सर्वात जास्त मतदारसंघ असून, तमिळनाडूतील सर्व 39 जागांसाठी मतदान होत आहे, तर राजस्थानमध्ये 12 आणि उत्तर प्रदेशात आठ मतदारसंघांत मतदान सुरू आहे. मागील निवडणुकीत या 102 मतदारसंघांमध्ये यूपीएला 45 तर एनडीएल 41 जागा मिळाल्या होत्या.

तमिळनाडूतील 38 जागा यूपीएला मिळाल्या होत्या. या राज्यात भाजपचा एकाही जागेवर विजय झाला नव्हता. भाजपला 400 पारचे लक्ष्य गाठण्यासाठी तमिळनाडूसह दक्षिणतील सर्वच राज्यांमध्ये आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. त्यामध्ये तमिळनाडू हे महत्त्वाचे राज्य आहे.

R

Mohammed Shami, PM Narendra Modi
Lok Sabha Election 2024: मतदानाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नागरिकांना आवाहन, खास मराठीत ट्विट करत म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com