MNS News: महायुतीच्या प्रचारात आता मनसेच्या इंजिनचाही आवाज घुमणार; राज ठाकरेंचा मराठवाड्याबाबत मोठा निर्णय

Raj Thackeray Join Mahayutu: देशाचा सर्वांगीण विकास करून पुढे जायचे असेल तर खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केवळ यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केली होती.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election: देशात होणारी लोकसभेची निवडणूक येणाऱ्या पिढीचे भवितव्य ठरवणारी असणार आहे. या वेळी झालेली एक चूक आपल्याला महागात पडू शकते. देशाचा सर्वांगीण विकास करून पुढे जायचे असेल तर खंबीर नेतृत्वाची गरज आहे.

केवळ यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केली होती. त्यानंतर आता महायुतीच्या प्रचारासाठी मनसेने राज्यभरातील समन्वयकांची नेमणूक केली आहे.

यामध्ये मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघांसाठी बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देण्याच्या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी (Lok Sabha Election) पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या आठ मतदारसंघांची जबाबदारी मनसे नेते बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात सहभागी होण्यासंदर्भात नेमून दिलेल्या समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल रोजी होत आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी (Nanded, Hingoli and Parbhani) या तीन मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी शनिवारी 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.

याशिवाय नांदेडमध्येही (Nanded) मोदींची सभा होणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मराठवाड्यातील तीन मतदारसंघांत मनसेची फारशी मदत महायुतीला होणार नाही, असे दिसते. उर्वरित पाच लोकसभा मतदारसंघात 7 आणि 13 मे अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदारसंघात मात्र महायुतीला मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेता येऊ शकते.

Raj Thackeray
Lok Sabha Election 2024 : रावसाहेब दानवेंचा पॅटर्नच वेगळा; संभाजीनगरची थेट उमेदवारीच केली जाहीर...

अर्थात प्रचारासाठी कोणी विचारपूस केली तर स्थानिक पदाधिकारी हे समन्वयकांशी संपर्क साधल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे. एकूणच मनसेने महायुतीच्या प्रचारासाठी समन्वयकांची नेमणूक केली असली तरी त्याला महायुतीचे उमेदवार आणि त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावरच सगळे काही अवलंबून असणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com