Lok Sabha Election 2024 : रावसाहेब दानवेंचा पॅटर्नच वेगळा; संभाजीनगरची थेट उमेदवारीच केली जाहीर...

Chhatrapati sambhajinagr News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या आठपैकी दोन उमेदवारांना जाहीर झालेली उमेदवारी मागे घ्यावी लागली.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुतीचे जागावाटप शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांतील वादांमुळे रखडले आहे. भाजपने आपल्या वाट्याच्या बहुतांश जागा जाहीर करून उमेदवारांना प्रचारालाही लावले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या आठपैकी दोन उमेदवारांना जाहीर झालेली उमेदवारी मागे घ्यावी लागली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाही. (Lok Sabha Election 2024)

ही जागा शिवसेना शिंदे गट लढवणार एवढेच एक पालुपद त्यांचे प्रवक्ते आणि नेते गेल्या महिनाभरापासून लावत आहेत. रामनवमीच्या मुहूर्तावर संभाजीनगरचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. शिवसेनेचे नेते इकडे मुहूर्त सांगत असताना दुसरीकडे पैठणमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी भुमरे यांचे नाव संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर करून टाकले.

Lok Sabha Election 2024
Bjp Vs Shivsena News : महायुतीचा उमेदवार ठरेना; संभाव्य उमेदवाराचे खोटे पत्र व्हायरल !

एवढेच नाही तर भुमरेंच्या प्रचाराला आम्ही जाणार, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. काल पैठण विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या वेळी केलेल्या भाषणात दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भुमरे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी मुहूर्त साधण्याआधीच दानवे यांनी भुमरे यांचे नाव जाहीर करत बाजी मारली.

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar News : खासदार विखेंना घरी बसवण्यासाठी शरद पवार मैदानात, विरोधकांची धाकधूक वाढली

अचानक दानवे यांनी नाव जाहीर केल्यामुळे भुमरे यांची चांगलीच गोची झाली. त्यामुळे त्यांनी दानवे यांच्या घोषणेला दुजोरा न देता संभाजीनगरची जागा शिवसेना लढवणार आणि उमेदवार एकनाथ शिंदे ठरवतील तो असेल, असे म्हणत वेळ मारून नेली. कदाचित रामनवमीला शिवसेनेच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होईल, असे सांगत भुमरे यांनी एक प्रकारे उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असल्याचे स्पष्ट केले.

Lok Sabha Election 2024
Congress on BJP : राणांना समजले, फडणवीस, बावनकुळे मात्र हवेत; काँग्रेसच्या लोंढेंचा हल्लाबोल

याआधी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांची कोंडी करत ते धनुष्यबाण चिन्हावर लढणार ही भाजपच्या कमळावर? हे त्यांनी स्पष्ट करावे, असे म्हणत आव्हान दिले होते.

याआधी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांची कोंडी करत ते धनुष्यबाण चिन्हावर लढणार ही भाजपच्या कमळावर? हे त्यांनी स्पष्ट करावे, असे म्हणत आव्हान दिले होते.

Lok Sabha Election 2024
NCP Sharadchandra Pawar News : शरद पवारांचा मराठवाड्यात झंझावात; बीडमध्ये तीन तर संभाजीनगरात एक सभा घेणार..

आता भुमरे यांची उमेदवारी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जाहीर केल्यामुळे आपली कोंडी होऊ नये यासाठी भुमरे यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते. एकूणच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबद्दल ताणल्या गेलेल्या सस्पेन्समुळे सर्वसामान्यांमध्ये आता याबद्दल फारशी उत्सुकता राहिलेली नाही, असे एकंदरीत चित्र आहे. रामनवमीचा मुहूर्त सांगितला गेला असला तरी अद्याप संभाजीनगर लोकसभेची जागा कोण लढवणार? आणि उमेदवार कोण असेल हे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com