Sandipan Bhumre : छत्रपती संभाजीनगरचा महायुतीतील तिढा अखेर सुटला; संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, हर्षवर्धन जाधव अपक्ष आणि महायुतीचे भुमरे अशी चौरंगी लढत होणार आहे.
Sandipan Bhumre
Sandipan BhumreSarkarnama

Lok Sabha Election 2024 : महायुतीत तेढ असलेल्या जागांपैकी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राखण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना Eknath Shinde यश आले आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते, पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील Imtiyaaz Jaleel, हर्षवर्धन जाधव अपक्ष आणि महायुतीचे भुमरे अशी लढत होणार आहे. या चौरंगी लढतीचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार, हे मात्र 4 जूनलाच समजणार आहे.

राज्याच्या सत्तेत आघाडीवर असलेले मुख्यमंत्री शिंदे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात मात्र बॅकफूटला गेल्याची चर्चा आहे. आतापर्यंत 13 जागांवर शिवसेनेला आपले उमेदवार निश्चित करता आले आहेत. त्यापैकी हिंगोली, वाशीम-यवतमाळ या लोकसभा मतदारसंघातून चक्क विद्यमान खासदारांना दिलेली उमेदवारी बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढावली. त्यातच हक्काचे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी शिंदे गटास जंगजंग पछाडावे लागले. आता छत्रपती संभाजीनगरचा वाद मिटला असून, येथून शिंदे गटाचे नेत संदीपान भुमरेंचे Sandipan Bhumre नाव फायनल झाले आहे.

Shivsena Letter
Shivsena LetterSarkarnama

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी संदीपान भुमरे यांना पक्षांतर्गत विरोध फारसा नाही. मात्र, भाजपने गेल्या तीन वर्षांपासून या मतदारसंघात तयारी केली होती. मतदारांशी वाढवलेला संपर्क, बूथ स्तरापर्यंतची बांधणीवर भाजपने भर दिला होता. आता ही जागा शिंदे गटाकडे गेल्याने भाजपमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

Sandipan Bhumre
Ajit Pawar On Rohit Pawar : साहेबांचाच रोहितला विरोध होता; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं होतं?

दरम्यान, संदीपान भुमरेंचे नाव चर्चेत आल्यापासूनच भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकणार असल्याचे संकेतही दिले आहेत. मात्र, राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याने नाराजीचे रूपांतर महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sandipan Bhumre
Ajit Pawar News : कुणी रडतील, डोळ्यांत पाणी आणतील तुम्ही मात्र...; अजितदादांचा सुळे, पवारांना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com