लोकसभा निवडणुका ( Lok Sabha Election 2024 ) जाहीर झाल्या तसे राजकीय पक्षांमधील गटबाजी, हेवेदावे, उमेदवारीसाठीची स्पर्धा, आरोप-प्रत्यारोपांना भरती आली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. अद्याप या ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. यातच माजी खासदार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, आमदार संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांची विमानतळावर भेट झाली आहे. तेव्हा, शिरसाटांनी खैरेंना उमेदवारीबद्दल शुभेच्छा दिल्याची माहिती आहे.
चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) या दोघांमधील वादामुळे जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या दाव्यामुळे त्यांच्याकडून उमेदवारी कोणाला? हे स्पष्ट झालेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेनेकडून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आज ( 17 मार्च ) सकाळी मुंबईला जाणाऱ्या विमानात चंद्रकांत खैरे, डॉ.भागवत कराड, अंबादास दानवे, संजय शिरसाट हे थोड्या फार अंतरावर बसले होते. कराड-खैरे यांच्यात उमेदवारीवरून चर्चा झाली. तर, विमानात बसण्यापूर्वी संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्याची माहिती आहे.
खैरेंनी मात्र केवळ स्मितहास्य करत शिरसाटांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. पण, त्यांच्याशी बोलणे मात्र त्यांनी टाळले. मुंबईत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रे'चा समारोप दादर येथील शिवाजी पार्कच्या मैदानावर सभेने होत आहे. महाविकास आघाडीतील सगळेच राज्यभरातील नेते या सभेसाठी मुंबईत दाखल झाले आहे.
चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हे दोघेही या सभेसाठीच मुंबईला गेल्याचे सांगितले जाते. उमेदवारीवर निर्णय घेण्यासाठी खैरे-दानवे यांना उद्धव ठाकरे यांनी बोलावले, अशी दिवसभर चर्चा होती. मात्र, या दोघांना राहुल गांधी यांच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
खैरे-कराड यांच्यात उमेदवारीवर चर्चा झाली
खैरेंनी कराडांना तुमच्या उमेदवारीचे काय? अशी विचारणा केली, "तेव्हा पक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच अन्यथा पक्षासाठी काम करणार," अशी सावध प्रतिक्रिया कराडांनी दिल्याचे समजते. दानवे-खैरे यांच्यात मात्र विमानात कुठलाही संवाद झाला नाही. शनिवारी दिवसभर उमदेवारीच्या दावेदारीवरून दोघेही माध्यमांच्या चर्चेत होते. आज मात्र दोघे मुंबईत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या समारोपाच्या सभेत उपस्थितीत असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.