Ambadas Danve News : अंबादास दानवेंना आईची कडक वॉर्निंग; ‘शिंदे गटात गेला तर तुझा अन्‌ आमचा संबंध संपला...’

Shivsena News : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या काही दिवसांत दानवे हे शिंदेच्या गोटात दाखल होणार असे सांगितले जात आहे. मात्र, दानवे यांनी त्याचा इन्कार केला आहे.
Uddhav Thackeray-Ambadas Danve
Uddhav Thackeray-Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माझी आई ही आमच्या कुटुंबाची प्रमुख आहे. ती माझ्यापेक्षा जास्त संवेदनशील आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी बेईमानी केली नाही पाहिजे. तू जर ठाकरेंशी बेईमानी केली तर तुझा आणि आमचाही संबंध राहणार नाही, इतकं कडक माझी आई मला बोलली आहे. इतकं ती ठाकरे यांच्यावर प्रेम करते, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या काही दिवसांत दानवे हे शिंदेच्या गोटात दाखल होणार असे सांगितले जात आहे. मात्र, दानवे यांनी त्याचा इन्कार केला आहे. त्यावेळी दानवे यांनी ही गोष्ट सांगितली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray-Ambadas Danve
Girish Mahajan Solapur Tour : दोन वेळा जिंकलेले सोलापूर भाजपच्या ‘संकटमोचका’ने रातोरात का गाठले?

अंबादास दानवे म्हणाले, संघटनेच्या प्रमुखांकडे हट्ट करण्याचा आणि आग्रह धरण्याचा मला अधिकार आहे. पक्षप्रमुखही आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात, त्यामुळे त्यांच्या आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन करतो. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी असताना मी इकडे तिकडे जाणार नाही.

मी गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. हे मी लपवून ठेवलेले नाही. माझी इच्छा पक्षप्रमुखांनाही सांगितलेली आहे. पक्षाने अजूनही नाव निश्चित केलेले नाही. मी अजूनही लोकसभेसाठी इच्छुक आहे. आजपर्यंत जे शिंदे गटाकडे गेले, त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी एक साधा शिवसैनिक आहे. मी साध्या घरात राहतो, त्यामुळे मला कशाचीही भीती नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दानवे म्हणाले, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रचाराच्या स्तंभपूजनाच्या कार्यक्रमाची मला माहिती नव्हती. त्याबाबत मी पक्षप्रमुखांकडे तक्रार करणार आहे. माझा उमेदवारीसाठी आग्रह नाही. पण मागणी कायम आहे. कोणी एकांगीपणाने वागत असतील तर पक्षप्रमुखांकडे त्याबाबत आम्ही बोललं पाहिजे, ते मी बोलणार आहे. उद्धव ठाकरे याबाबत योग्य तो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.

Uddhav Thackeray-Ambadas Danve
Paricharak Vs Autade : मंगळवेढा सिंचन योजनेला मंजुरी मिळताच आवताडेंच्या फ्लेक्सवरून परिचारक गायब

खैरेंकडे पाहून मी थोडंच काम करतो?

चंद्रकांत खैरे मला नेहमीच डावलतात. त्यात नवीन काही नाही. मी खैरे यांच्याकडे पाहून थोडंच शिवसेनेचे काम करतो, मी ठाकरे यांच्याकडे पाहून काम करतो. खैरे यांना तिकीट मिळाले तरी मी पक्षाचा निष्ठावंत सैनिक आहे. माझ्या मनात पक्षाविषयी कोणतीही नाराजी नाही. खैरे यांचे नव्हे; तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवाराचे काम करेन, असे रोखठोक मतही दानवेंनी व्यक्त केले

शिंदेंची शिवसेना दोन-पाच महिन्यांची

शिंदे यांची शिवसेना ही दोन-पाच महिन्यांची आहे, त्यामुळे त्या शिवसेनेत मी कदापि जाणार नाही. शिंदे गटात जाणारा तो मी नव्हेच. जे बोलतो, ते करणारा मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी खुर्ची आणि सत्तेसाठी हपालेला नाही. पक्षप्रमुखांनी उद्या सर्व सोडायला सांगितलं तर मी सर्व एका मिनिटात सोडेन. एखाद्या निवडणुकीसाठी पक्षाशी गद्दारी करणारा तर मी मुळीच नाही, असेही अंबादास दानवे यांनी ठणकावून सांगितले.

R

Uddhav Thackeray-Ambadas Danve
Vasant More News : वसंत मोरे यांची सोशल मीडियावर क्रेज! मात्र राजकीय पक्षांना झालेत नकोसे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com