Uddhav Thackeray On Hemant Patil : उद्धव ठाकरेच म्हणतात, हेमंत पाटलांनाच उमेदवारी द्या, कारण...

Uddhav Thackeray Latest News : शिवसेनेशी गद्दारी केलेल्या प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या मनात धगधगती 'मशाल' पेटवत आहेत.
uddhav thackeray hemant patil
uddhav thackeray hemant patil sarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) पक्षात फूट पडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या मंत्री, आमदारांचा गद्दार, असा उल्लेख करत समाचार घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या जनसंवाद सभांमधूनही ठाकरे आक्रमकपणे शिंदे गटावर तुटून पडत आहेत.

uddhav thackeray hemant patil
Uddhav Thackeray : हिंगोलीत हेमंत पाटलांना चितपट करण्यासाठी उद्धव ठाकरे टाकणार मोठा डाव

आज ( 18 मार्च ) दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी संवाद सभेत एकनिष्ठ शिवसैनिकांसमोरच अशी मागणी केली, की त्यामुळे सगळेच अवाक् झाले. "माझी तर इच्छा आहे, की गद्दारांनी हेमंत पाटील यांनाच हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, त्यांची अनामत रक्कम जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही," अशा शब्दांत ठाकरे यांनी पाटलांना आव्हान दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम झाले असून, कोणत्याही क्षणी त्यांची यादी जाहीर होऊ शकते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. उद्धव ठाकरे हिंगोलीच्या मेळाव्यातच त्यांचे नाव जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ठाकरेंनी सस्पेन्स कायम ठेवत फक्त हिंगोलीकरांना गद्दारीचा बदला घेण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन केले.

"हिंगोलीची जागा आपण जिंकणारच, पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, निवांत राहून चालणार नाही," असेही ठाकरे यांनी सूचित केले. उद्धव ठाकरे यांचा याआधी रद्द झालेला हिंगोली दौरा आजपासून सुरू झाला. दोन दिवस ते हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात जनसंवाद सभा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे घेणार आहेत.

uddhav thackeray hemant patil
Uddhav Thackeray News : शिवतीर्थावर पहिल्यांदाच बदललेला ठाकरेंचा सूर पचनी पडणार का?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या मनात धगधगती 'मशाल' पेटवत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या हिंगोलीत त्यांनी गद्दार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी मिळावी, जेणेकरून त्यांची अनामत रक्कम जप्त करता येईल, असा विश्वास व्यक्त करत ठाकरेंनी शिंदे गटाला निर्वाणीचा इशाराही दिला.

( Edited By : Akshay Sabale )

R

uddhav thackeray hemant patil
Bhaskar Jadhav On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंबाबत भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद; म्हणाले, "मी कधीही..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com